खेळणारा खेळून जातोच डाव प्रेमाचा.
कारण दावतो तो खोटा लागाव प्रेमाचा...
कळूनही सार आपण फसतोच म्हणावं
कारण तसा आपला स्वभाव प्रेमाचा...-
माझ्या मातीवर प्रेम करतो
ना की कोणत्या जातीवर प्रेम करतो.
कुठे आता फारसा खास फरक पडतो.
तू नसल्यावर आता घास नरक घडतो.
ना शब्दाची संगत ना जिवणा रंगत
तुझ्या नंतर कुठे श्र्वास हरेक पडतो.-
खोटेपणांचा मज नकोय मोठेपणा
आहे तसाच राहू दे मज छोटेपणा.
मोठे झाल्यावर येतो म्हणे गर्व.
गर्वाने आपुले सुटते म्हणे सर्व.
नको मला दुरावा आपुल्यात कधी
भावनांचा ओलावा वसुदे माझ्या मधी.
दुःख मला दे त्याचे, सुख माझे दे त्यांना
माझ्या आपुल्याना माझ्या भावड्यांना...-
आयुष्यात खूप दमल्या सारखं वाटतंय. किती दिवस स्वतःला खर आहे अस सिद्ध करत राहायचं. किती दिवस स्वतःच्या स्पेस साठी धडपडत राहायचं. खूपदा एकटाच रडतो, पुन्हा स्वतःच स्वतःच्या मनाची समजूत काढते पुन्हा हसून पुढचा दिवस सुरू होतो. मनात साऱ्या गोष्टी ठेऊन. कस जमतं माहित नाही लोकांना move on व्हायला काही गोष्टी मधून. मला तर वाटतं कधी तरी, देव माझ्या मध्ये move on च feature टाकयलाच विसरला काय. काही दुखऱ्या बाजू नेहमी मला त्रास देत राहतात. समजवायला कोण येत नाही म्हणून मीच मनाला काही तरी खोट्या गोष्टी सांगून समजावतो आणि सांगतो.
'तू आहे तुझ्यासाठी तरच आहे हा जग
नाही तर फक्त हा माणसांचा ढीग,
पडझड धडपड अन् लढत राह तू
सिद्ध होइतोवर तूझ्यात ज्वलंत राहूदे धग...'-
ज्यांना भावना वाचता येत नाहीत
शब्द हे
त्यांच्यासाठीच लिहावे लागतात....-
काही सुचत असेल तर लिहावं
काही रुचत असेल तर लिहावं.
लिहाव मनातलं लिहावं रानातल.
किंचित न ठेवता संकोच लिहावं क्षणांतल.
लिखाणाला नसावे बंधन, लिखाणाला असावे स्पंदन.
लिखाण असावे अबाधित, जणू काही गोंदण.
लिहता लिहता रक्ताची होऊन जावी शाही
पण लेखक अन् लिखाणाची होऊन जावी ओवी.
कसला यात अभाव नसू दे, कुठला यात दूजाभाव नसू दे.
माझ्या ह्या लिखाणात केवळ, प्रेमळ एक स्वभाव वसू दे...-
तूझ्या नसल्यावर ही होते माझी कविता
आधी तूझ्या सवेच्या होत्या.
आता तुझ्यासाठी दुवेच्या आहे...-
तूझ्या नसल्यावर ही होते माझी कविता
आधी तूझ्या सवेच्या होत्या.
आता तुझ्यासाठी दुवेच्या आहे...-