सखी मंद झाल्या तारका
अन् चंद्र ही झाला बारका
का आली नाहीस तू आज
रात्रभर मनी प्रश्न हाच सारखा
सवालांची झाली गर्दी डोक्यात
तुझ्या येण्याचा नव्हे आज वार का
किती गेल्या पौर्णिमा अन् अवसा
कोर्टा सारख्या तू देत आहेस तारखा
येशील उशिरा अन् बघशील रागात
मी पामर छेलेल कटाक्ष तुझा मारका
तुझ्या वाटेवर असतात कायम डोळे
असे वागून तू करू नकोस मला पोरका
कधी तरी ये हळुवार माझ्या न कळता
प्रेमाचा कर वर्षाव अन् विरहाला कर पारखा
गायत्री
-
पारदर्शक असाव्या मनाच्या भिंती
हसू अन् आसू स्वच्छ ज्यातून दिसती
नको हेवेदावे नको मत्सर द्वेष काही
राग लोभ स्पष्ट असावे असेल जेही
शक्य असेल तेवढे घ्यावे समजून उमजून
माफ करावे अन् माफी मागावी आवर्जून
कुणी नसते आयुष्यभर तरी विचार असतोच साऱ्याचा
जसा मनाला मोहवून उरतो क्षणभर स्पर्श वाऱ्याचा
मन जपून पार पाडल्या जातात चालीरीती
बंध व्हावे घट्ट गळून पडाव्या मनाच्या भिंती
गायत्री
-
मेरा वक्त लौटा दो
वो खुश मिजाज अंदाज लौटा दो
बाटे थे साथ तेरे जो
वो मेरे गहरे राज मुझे लौट दो
वो हसी सुबह लौटा दो
हंसती खिलखिलाती शाम लौटा दो
साथ किया था वो काम लौटा दो
दिया था बड़े प्यार से वो नाम लौटा दो
मन का सुकून लौटा दो
वो हर पल जो बना है याद
तुमने कही हर बात लौटा सकते हो
अगर तो लौटा दो
मेरा वक्त लौटा दो-
मनको कोरा करने केलिए
कागज़ को रंगो से भरना पड़ता है
रंग भावनाओं का
रंग अन्दिखे ज़ख्म का
रंग हंसते चेहरे के पीछे छिपे दर्द का
रंग रंग बदलती दुनिया का
-
आज मी फुल झाले असे मला वाटले
परंतु काटा रुतल्या परि होते खटकले
कुणाच्या मनास करून रक्तबंबाळ
कळले न मला अन् मी उगाच मटकले
सुगंधी फूल झाडाभोवती उगवले तृण
सोबत त्याच्या कसे फुलही गेले उपटले
समजले उमजले जेव्हा सारे कटू सत्य
नकळता कुणास तिथून अलगद सटकले
स्वतःला दुखवून जगले कायम इतरांसाठी
सोड हे व्यर्थ पाश म्हणून स्वतःला दटवले
स्वतःसाठी मी आज फुल झाले अन् कालच्या
कोमेजल्या कळीला जणू लावण्यरूप आले
दरवळले चोहू दिशास मी लहरले मी बहरले
जणू कालच्या कळीला लावण्यरूप आले
गायत्री
-