Ganesh Jamale   (#गणा)
401 Followers · 1.0k Following

अनभिज्ञ आशा या अनंत जगात आपलासा वाटणारा वाटाड्या 😊
9th sept. 🎂
Maharashtra
Mh 23 Beed
Joined 17 August 2018


अनभिज्ञ आशा या अनंत जगात आपलासा वाटणारा वाटाड्या 😊
9th sept. 🎂
Maharashtra
Mh 23 Beed
Joined 17 August 2018
14 FEB AT 12:28

बिंदी ती भाळावरती जणू सजला चंद्रमा नभात,
कशाला हवी ती साखर जेव्हा मुग्ध गोडवा गळ्यात
कुंतल ते रेशमी वाऱ्यावरती उडताना,
वाटे श्रावणाचा पाऊस सुखद सरी पडताना
प्रखर सुर्यासम तेज चेहऱ्यावर असे,
हळूच स्मितहास्य करता आणखीनच उठुन दिसे
वाणी ती पियुष अन नयन हे नक्षत्र,
कसे बनविले तू विधात्या अति रेखीव हे चित्र

-


26 AUG 2023 AT 2:08

जगाला उत्तर
बाकी कोणी नाही तर
तुमचे कष्टच देणार
Good Night

-


14 JUN 2023 AT 17:25

रक्ताचा मी घाम करुनि देश चरणी वाहिला

संघर्ष तो रणावरचा साऱ्या जगताने पाहिला

जिंकले परदेशी पण हरले माझ्या मातीत

पाठीवरची थाप झाली चाबूक एका रातीत

भयभीत ही पावले आता धरण्यावर बसली

उजड भविष्याची आज ही खोल दरी दिसली

बळी न पडावे कोणी उद्या भावभावंडे आपली

कुट्ट हा काळोख सबब चिंता उरी दाटली

काय चुकले मातृभूमी झुंज ही चालली पुन्हा

अन्यायाला दिले झुगारून एवढाच माझा गुन्हा

-


25 MAY 2023 AT 3:06

स्वप्न

कधी हिऱ्या माणकांनी सजवले जातात
कधी चिंब आसवांनी भिजवले जातात
स्वप्न असतात ते साहेब,
कधी पेटवल्या पेटवल्या विझवले जातात

कधी घट्ट मनावर रुजवले जातात
कधी कुट्ट पाषाणावरती झिजवले जातात
स्वप्न असतात ते साहेब,
कधी उठवल्या उठवल्या निजवले जातात

-


14 MAY 2023 AT 17:08

अश्रू

तुझे अश्रू जणू माणकातील नाजूक मोती किंमत यांची करणे अगदीच कठीण
कठीण परिस्थितीतही नजर चुकवून येतात कधी अन कधी जातात देवच जाणे
देवच जाणे यांचे मूल्य आहे अपार म्हणे 'आहेत खूप मौल्यवान मी नाही घेऊ शकत उधार'
उधार आहे सुख आणि उधार आहे दुःख यांच्यावर खूप सारे
म्हणूनच व्याजापायी सजतात डोळ्यांत तुझ्या सारखेच
सारखेच असते यांमध्ये दडलेले एक अनभिज्ञ कोडे
यांतील आशय अति विचित्र परि स्वरूप किंचित थोडे
थोडे थोडे म्हणता कधी विरून जातात समजत नाही
फार करतो प्रयत्न आई पण यांतील कोडे मला उलगत नाही
यांतील कोडे मला उलगत नाही..

-


10 MAY 2023 AT 23:35

जरूरत
उसने मुझे पुछा, हर वक्त मुझे याद करना जरुरी है क्या ?
मैने बोला, दिल से कोई पुछता है क्या उसका धडकना जरुरी है क्या ?
चाँद से कोई पुछता है क्या उसका चमकना जरुरी है क्या ?
पानी से कोई पुछता है क्या उसका बेहना जरुरी है क्या ?
कली से कोई पुछता है क्या उसका खिलना जरुरी है क्या ?
पुछ ले फुलो को उनके मेहकने की जरूरत
उसी तरह तू है मेरी जिंदगी में
यकी न हो तो खुद से पुछ
तेरे बिना मेरा पल भर भी जीना जरुरी है क्या ?
जरुरी है क्या ?

-


29 APR 2023 AT 18:17

आँसुओ के समंदर में दर्द की लहरें ऊँची उठ रही हैं
मुसिबतों के काले बादलों में आशाओं की रोशनी मिट रही हैं
चुनोतियों के उस अंधेरे में हौसलों की बस एक किरण काफी हैं
सपनों की ये डूबती कश्तियां उम्मीदों के तिनको के सहारे अभी भी बाकी हैं

-


25 APR 2023 AT 16:41

सावली
लक्ष कोणी देत नाही पण नेहमी सोबत असते
संकटांचे कडक ऊन पडले की ती आपल्याला दिसते
वाटत असेल तिलाही बंड करून उठावे
एकल्या धुकल्या माणसासोबत किती दिवस बसावे
सर्वांसारखी आपली पण एक सुंदर दुनिया रंगवावी
काळ्याकुट्ट प्रतिमेत या चंदेरी चकाकी मिसळावी
वाटले असे तरी त्याचा ससेमिरा कधीच मिरवणार नाही
अनावश्यक गोष्टींचा कित्ता ती कधीच गिरवणार नाही
आहे तशीच राहणार नेहमी प्रामाणिक
साथ न सोडणारी सावलीच ना ती
प्रत्येक दुःखात कायम हिंमत द्यायला
आणि अमुल्य सुखात किंमत द्यायला.

-


19 APR 2023 AT 11:12

मन
मन जोडुनी जाते, मन तोडुनी जाते
सवरलेला खेळ मन मोडुनी जाते
मन पाखरू स्वैर दूर उडुनी जाते
मन सुन्न मन स्थिर भावनांत बुडूनी जाते
मन प्रसन्न मोगऱ्याची बाग जणू
मन सुमधुर गाण्याचा राग जणू
मन ज्वलंत धगधगती आग जणू
मन सुंदर सोनियाचा साज जणू
मन शांत भावनांचा खेळ असते
मन आवडत्या नावडत्यांचा मेळ असते

-


11 APR 2023 AT 16:48

अनभिज्ञ अशा अनंत जगात आपलासा वाटणारा वाटाड्या

-


Fetching Ganesh Jamale Quotes