जीव लावणारी माणसं
जीव लावणारी माणसं आज दुर्मिळच.
अशी माणसं गेली की त्यांचं असणं किती महत्वाचं होतं...!
ही जाणीव फार वेदनादायी..!
-ग.म.मा.उगले-
माणूस
माणूस झाला छोटा
मनाने झाला गोटा
प्याऱ्या झाल्या नोटा
माणसापेक्षा
-ग.म.मा.उगले-
अलक
आभाळ दाटून आलं.. बघता बघता पावसाच्या सरी मंडपातून आत येऊ लागल्या..नवरदेव नवरीसह सगळं वऱ्हाड ओलंचिंब होत होतं.. पावसाचा आनंद घेत सावधान... शब्द कानावर पडताच वधूवरांवर अक्षदा पडत होत्या ...नवरीच्या बापाला वाईट वाटत होतं, "आपण पाहुण्यांची व्यवस्था करू शकलो नाही.." एवढ्यात पावसात नाचणाऱ्या एका चिमुकलीचे शब्द त्याच्या कानावर पडले," बाबा , कित्ती मज्जा येत आहे न..! एवढी मजा आजपर्यंत कोणत्याच लग्नात आली नाही.."
-ग.म.मा.उगले,पातुर्डा
9689453402-
तटस्थ
खरं तर तटस्थ माणसाच्या वाट्याला वाईटपण फार कमी येते,प्रसंगी असा व्यक्ती सर्वांच्या दृष्टीने चांगलाच. जो स्वतःला गरज पडल्यास कोणाची मदत घेईलही पण इतरांना मदत करणे तो प्रकर्षाने टाळतो. अडचणीच्या काळत इतरांना मदत करणाऱ्याच्या वाट्याला नेहमी वाईटपण येते..बरेचदा स्वतःचे नुकसान करून ज्याला मदत केली तो देखील आपल्याबद्दल वाईट विचार करायला लागतो...म्हणून इतरांना मदत करणाऱ्यांची संख्या आता घटत चालली आहे आणि आत्मकेंद्री वृत्तीला तटस्थतेचं लेबल लावून वावरणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे.
ग.म.मा. उगले, पातुर्डा-
कत्तलखाना
कळे ना काही मजला आता
कत्तलखाना की हा गोठा
वासराचा चोरून हिस्सा
चोर येथे झाला मोठा
-ग.म.मा. २६ जून,२०२३
-
निर्लज्जम् सदा सुखी.
माणसानं निर्लज्ज असावंच आपल्या माणसांसाठी, आपले खरे नातेवाईक, सच्चे मित्र यांच्यासाठी तर नेहमीच. कधी कधी ते म्हणतीलही," किती निर्लज्ज आहे हा!" पण आपण फक्त त्यांच्यासाठीच असे आहोत हे ही त्यांनाही माहिती असते.
आपली माणसं गमावण्यापेक्षा 'निर्लज्जम सदा सुखी' हे तत्व अवलंबवायला काय हरकत आहे?
काहो तुयशीरामब्वॉ, गोठ खरी की खोटी?
-ग.म.मा.
#9689453402-
निर्लज्जम् सदा सुखी.
माणसानं निर्लज्ज असावंच आपल्या माणसांसाठी, आपले खरे नातेवाईक, सच्चे मित्र यांच्यासाठी तर नेहमीच. कधी कधी ते म्हणतीलही," किती निर्लज्ज आहे हा!" पण आपण फक्त त्यांच्यासाठीच असे आहोत हे ही त्यांनाही माहिती असते.
आपली माणसं गमावण्यापेक्षा 'निर्लज्जम सदा सुखी' हे तत्व अवलंबवायला काय हरकत आहे?
काहो तुयशीरामब्वॉ, गोठ खरी की खोटी?
-ग.म.मा.
#9689453402-
बाप
बाप पोटाची भाकर बाप इमानी चाकर
बाप जगाची शिकार लेकरासाठी
बाप जात्यातलं पीठ बाप भाजीतल मीठ
बाप फुलाचं रे देठ लेकरासाठी
बाप सुखाची बरसात बाप हिंडे घरं सात
बाप दिव्याची रे वात लेकरासाठी
बाप अवघळ घाट बाप सोनेरी पाह्यट
बाप समुंद्राची लाट लेकरासाठी
बाप घराचा उमोठा बाप गायीचा रे गोठा
बाप देवाहून मोठा लेकरासाठी
बाप मोठी एकादस बाप कारल्याचा रस
बाप लाडवाचा घास लेकरसाठी
-ग.म.मा.उगले, पातुर्डा मो.9689453402— % &-
भातकं
" कावं, आज भातकं नायी आनलं लेक्राईसाठी."
"भातक्याचे पैसे कागद लिवनाऱ्याले द्या लागले आज."
-ग.म.मा.उगले— % &-
पायदळी
हा बुडबून गेला तो बुडवून गेला
जो आला तो पायदळी तुडवून गेला
-ग.म.मा.उगले,पातुर्डा— % &-