"मेघसखी
सावळ्या स्वप्नांची सखी,
हसली की नभात गंध दरवळतो,
डोळ्यांत तिच्या दीप लखलखती,
आवाजात ओलावा झरतो.
तिला "मेघसखी" म्हणतो मी,
मनाच्या पावसासंगे नांदणारी,
हसणं तिचं... धबधब्यासारखं,
हृदयात थेट कोसळणारी."
- गजानन-
Gajanan Bothinge
1 Followers · 4 Following
Joined 25 February 2021
8 APR AT 9:06
26 FEB 2021 AT 21:42
●ती एक मार्मिक●
कुठली कोण ती एक तनया
भेदक नजर, तपनीय काया
निलवर्णी सुंदर अक्ष
मारी मज वर तीक्ष्ण कटाक्ष
वाटसरू मी तिच्या वाटेचा
ती एक मेदिनी तिलोत्तमा
निलवर्णी सुंदर अक्ष
मारी मज वर तीक्ष्ण कटाक्ष
फाल्गुन वेध धरी मज हृदयी
घायाळ करिती त्याच क्षणी
निलवर्णी सुंदर अक्ष
मारी मज वर तीक्ष्ण कटाक्ष
-