प्रेम आणि मोह दोघेही माझ्या समोर न्याय मागायला आले....
कि कोणाचे स्थान कोठे..? मी निपक्षपातीपणे उत्तर दिले...
आपल्या पात्रतेच्या व्यक्तीपाशी एकरुप होते ते प्रेम ...
आणि समोर कोण आहे ? कसा आहे ? कुठला आहे ? कधीचा आहे ? याचा
कोणताही मार्ग न पाहता कोणासोबत ही कसाही वाटतो आणि कुठेही थांबतो तो मोह....-
जिथे स्पष्टपणे जाणीव होते, आपण ज्यावर हक्क सांगू पाहतोय ते आपले नाहीच, तिथे माघार घ्यायची असते.
यातच शहाणपण असतं....💔-
मांग लूँ यह मन्नत कि फिर ...
यही जहाँ मिले ...
फिर यही गोद मिले फिर ...
यही माँ मिले ....😪❤️
Unknown-
आठवणींवर जगता येईलही...
पण ...,
आठवणी सुद्धा त्याच दर्जाच्या हव्या असतात...❤️
Unknown-
प्रेम व्यक्त करायला मर्यादा नसावी,
शब्दांपेक्षा कृतीतून त्याची अनुभूती अधिक असावी..❤️
-
मरण जगता यायला हवं, जे मरणाला कवटाळतात तेच इतिहास रचतात! पण ते खास असावं, अखेरच्या श्वासापर्यंत विजयाच्या उन्मादात असावं..🏹
#मृत्युंजय-
#रात्र
सगळी भांडणं, हेवेदावे, गैरसमज यावर उपाय फक्त रात्रीकडे असतो. दिवसभर एकमेकांची तोंडे बघू वाटली नाहीत तरी रात्र यावर तोडगा काढते. काळ्याकुट्ट काळोखाकडे सुद्धा काहीतरी चांगलं निर्माण करण्याची अफाट ताकद असते. जे दिवसाला शक्य नसतं ते ते सर्व रात्रीत शक्य होतं...
दिवस प्रकाश देत असला तरी गर्दी, गोंधळ, गोंगाट, नको असलेले ऊन ही देतो....
रात्र शांत असते , तिला शीतल चंद्राची सोबत आणखी देखणी करते... सगळे हेवेदावे गळून पडतात, तक्रारीचे सूर बोथट होतात, शांतता चांगल्या विचारांना जन्म देते, मन शांत होत प्रत्येक सूर कानापर्यंत मनापर्यंत भिडला जातो...
दिवसा इतकीच रात्र ही महत्वाची आहे... तीच स्वतंत्र अस्तित्व आहे... आणि तेही तितकंच देखणं आणि भुरळ घालणार आहे...
आणि म्हणूनच मला रात्र आवडते....🖤🖤
मन मौजी-
*विचार*
स्व:ताच्या अज्ञानाची व्याप्ती ओळखणे म्हणजेच खरे ज्ञान होय.-