एक काव्य प्रवासी   (एक काव्य प्रवासी)
45 Followers · 44 Following

Blogger|writer|dancer|Engineer👩‍💻

Insta id:ek_kavya_pravasi
Joined 29 May 2021


Blogger|writer|dancer|Engineer👩‍💻

Insta id:ek_kavya_pravasi
Joined 29 May 2021

तु निरागस चंद्रमा,
तु सखी मधु शर्वरी..
चांदने माझ्या मनीचे,
पसरले क्षितीजावरी…

-



विसावा..

गुंतलेल्या मनाला क्षणभर विसावा तुझा,
मोहरलेल्या कळ्यांना भासे सुगंध तुझा,
इतके पांघरले कवडसे ऊन्हाचे,
मृगजळ विचार हे माझे काही क्षणांचे..


-



Dear Diary,

To live with regrets and guilt in mind is very difficult.
Forgive and forget is the only option remain to live peaceful life ahead.

-



उसवले होते धागे भावनेचे,
पसरले होते जाळे विचारांचे,
हळूच आलीस तू कुठून कशी,
सावराया माझी जीवनाची होडी,
गुंतवले तू धागे अलगद एकात एक,
सजवले नवे मैत्रीचे नाते तू सुरेख..

-



गर्द निळे जांभळे पसरले रंग आकाशी,
स्वछंद मुक्त भिरे या नभी हे पक्षीही,
मंद मंद ही हवा वाहते येतो अंगावर शहारा,
स्वता मध्ये रमूनी करते आठवांचा पहारा..

-



काजळ्या राती पाहून तुला माझे ङोळे दिपले.. पाहूनी तुला मी माझ्या शब्दांचे गालिचे पसरवले.. धुंद कळ्या मोहरल्या जणू त्यांना चांदणीने खुणवले.. अबोल मनाचे बोल बघ गालावर उमटले..

-





I'm that one poetry, which you can read but, you will never understand.

-



जोडता धागा मी सुखाचा
गवसले धागे अनेक,
गुंफले ते एकात एक,
सजले जीवन सुरेख..

-



संथ निळे पाणी,
वाहे रानमयी...
निळ्या भोर आकाशी,
पक्षी गात गाणी,
हिंडती चहूकडे..


-



स्वप्न तोकडे बांधून उराशी,
सरला दिवस चालून जराशी,
भाबडी आस धरून मनाशी,
उगवेलं दिवस उद्या सुखाचा,
लढतोय रोज मी नव्या संकटांशी,
किती हा संघर्ष अजून असे माझ्या नशिबी..

-


Fetching एक काव्य प्रवासी Quotes