पडता सूर्य किरणे धर्तीवर
धर्तीस नंव चैतन्य येतं
पक्ष्यांच्या किलबिलीने मन प्रसन्न होता
फुलांचा सुगंध पसरे आसमंतात
नव स्वप्ने घेउनी आली हि प्रभात!
सौ विमल जायभाये-
नातं आपल्या अतुट प्रेमाचं
दिवसेंदिवस असं फुलावं!
तुझ्या वाढदिवसाला तु
माझ्या प्रेमानं चिंब व्हावं!
Happy Birthday Dear Huby!
From: सौ.विमल विठ्ठल जायभाये-
ह्या फुलांच्या बागेत
खेळे माझे फुलपाखरु
डवरली बहरली माझी बाग
शहारे कसे आवरु सावरु
सौ.विमल विठ्ठल जायभाये-
मी तुझ्याचसाठी राञंदिवस
शब्द शब्द लिहित बसले
माझी लेखणी निरर्थक...
का माझे प्रयत्न व्यर्थ ठरले?
सौ.विमल विठ्ठल जायभाये-
लाल रंग तुमच्या गालांसाठी!
काळा रंग तुमच्या केसांसाठी!
पांढरा रंग तुमच्या मनासाठी!
नीळा रंग तुमच्या डोळ्यांसाठी!
पीवळा रंग तुमच्या हातासाठी!
गुलाबी रंग तुमच्या ओठांसाठी!
हिरवा रंग आरोग्यासाठी!
चला जीवन जगुया रंगीत आयुष्यासाठी!
सौ.विमल विठ्ठल जायभाये-
रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
रंग नात्यांचा, रंग बंधनाचा
रंग हर्षाचा, रंग उत्साहाचा
रंग मर्यादांचा, उत्सव सप्त रंगाचा
चला रंगुया सप्त रंगामध्ये, रंग पंचमीच्या रंगीबेरंगी शुभेच्छा!!!-
तुच माझी रंग, रांगोळी
तुच माझी पुरन पोळी!
Aतुच माझी झोपेची गोळी
तुच माझी आनंदाची होळी!
धुलीवंदन च्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!!
सौ.विमल जायभाये-
ऊठ!
हे आकाश तुझेच तर
डळमळु नकोस
घाल गवसणी
आपल्या काबूत कर!
बघु नकोस मागे
थवे पराजीतांचे
जिंकुन टाक डाव
जीवन विजयी जनांचे!
-प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये
०८.१२.२०१९
-
महापरीनिर्वाण!
मारुन मरणास तूम्ही
मृत्युस हरउन गेला!
अहंकार भल्याभल्यांचे
मातीत जिरउन गेला!
प्रज्ञा शील करुणेचे तूम्ही
बीज इथे रुजवून गेला!
गावाबाहेरील लोकांसाठी अन्न
भर चौकात शिजवून गेला!
तव धारदार लेखणीने तूम्ही
स्री शुद्रातीशुद्र सजवून गेला!
वेद पुराण लेखणीला सुध्दा
तूम्ही येथे लाजवुन गेला!
मावळला प्रज्ञासुर्य असा हा
निळी निळाई थिजवून गेला!
लाखो बहुजनांना 'बाबा' तूम्ही
दुखाश्रूंनी पुरते भिजवुन गेला!
-प्रा.डॉ.विठ्ठल जायभाये (६ डिसेंबर २०१९)-