माणसाच्या आयुष्यातला सर्वात मोठा गुरु म्हणजे त्याच्यावर येणारी 'वेळ'. कारण तो जे शिकवतो ते जगात कोणीच शिकवू शकत नाही. हा गुरु सर्वांच्याच आयुष्यात येतो फक्त आपण त्याला ओळखण्यास असमर्थ ठरतो.
-
कितने नसीब की बात हैं
मैं वो देख सकता हूँ जो मैं सोचता था की खूबसूरत नहीं हैं
कितने नसीब की बात हैं
उन लोगों का साथ होना जो मैं सोचता था कीं सादगीपसंद नहीं हैं
कितने नसीब की बात हैं
ये एहसास का होना की कितना गलत था मैं !
मनुजा, 04/29/24-
हकीकत ऎसी हैं कीं हर चीज चकनाचूर हो जाए,
मगर ये दिल आज फिर नया सपना सजाए बैठा हैं !
-
कविता लिहिताना बहूदा शांत असतो मी
कधी उदास तर कधी खुदकन हसतो मी
धन-धान्य, संपत्ती इतरांसाठी ठेव देवा
माझ्यासाठी फक्त शब्दांची खाण मागतो मी
कधीतरी शब्दांना माझ्या अशी धार यावी
कविता माझी सर्वांच्या हृदयावर स्वार व्हावी
पांडुरंगा एवढे एकच वरदान मागतो मी !
मनुजा @Dr. Manoj patil
03/21/2024
-
कधी-कधी विनाकारण खूप हसावं,
आतून नसलो तरीही वरून खूष दिसावं
पैसा तर येत जात राहील "मनुजा"
पण माणसाने ढोंगी कधीच नसावं !
-मनुजा @Dr.Manoj Patil
03/10/2024-
काय करावं ह्या मुंगीला
चावली व्योमच्या ढुंगीला
ढुंगी त्याची लाले-लाल
व्योमचे झाले खूपच हाल
व्योमला काही सूचेना
मुंगी काही दिसेना
मुंगी ला शोधाली घरभर
व्योमला लागली घरघर
व्योम आता अजूनच चिडला
चालता-चालता ढुंगीवरच पडला
व्योम आता रडू लागला
रडता-रडता चिडू लागला
म्हणाला, मुंगीला आता मी सोडनार न्हाय
करेन तीच खाली डोक वर पाय
कुठून अचानक मूंगी त्याला दिसली
व्योमच्या तावडीत आायतीच फसली
मूंगी आता ठसठसा रडू लागली
व्योमच्या पाया पडू लागली
व्योमला आता मूंगीची दया आली
थोडस वाकून तो बसला खाली
दम देऊन मुंगीला म्हणतो कसा,
इथून पुढे नादाला माझ्या जर लागशील
उगीच फुकट कत्र्यागत मरशील,
चावा, माफी, दम असं सगळं रात्रीतच घडलं
सकाळ झाली अन व्योमच स्वप्न मधेच मोडलं
- मनूजा (Dr.Manoj)
07/03/2024-
सोडली साथ जरी आपुल्याच मातीने
नुसत्या दवावर जन्मेन मी,
आव्हान परक्या ऊन-वादळांचे पेलन्या
तप्त खडकांवरही उमलेन मी!
Dr. Manoj 02/11/2024-
स्टेटसला सगळ्यांच्या आज 'राम' आहे ,
अन वागण्यात त्यांच्या हराम आहे,
प्रेम रामावर असेल एकच दिवस
नंतर ह्या प्रेमालाही विराम आहे !
-Dr. Manoj, 01/22/2024-