Dr. Gitanjali Abhang   (स्वमतांजली)
39 Followers · 16 Following

Joined 30 June 2020


Joined 30 June 2020
12 OCT 2023 AT 19:00

You are only one who can heal your life.

-


25 SEP 2023 AT 13:11

#No trend हा trend कधी येणार.....

-


5 MAR 2023 AT 21:53

आयुष्याचा खरा अर्थ कळल्यावर सुरू होते तीच आहे, खरी नवी परीक्षा माणूस जरी आयुष्यभर शिकत असला तरी परीक्षा मात्र कधीतरीच असते... रोजचं असतं शिकण, शिकवणं आणि समजणं... पण ह्याच रोजच्या आयुष्यतले जे प्रश्न आहेत ते खऱ्या परीक्षेत असतील असे नाही. परीक्षा कधी माणसाच्या मनाची, गुणाची, विश्वासाची , तत्वाची, चरित्राची असते पण खरी परीक्षा ही स्वतः सोबत असते. त्या नव्या परीक्षेत माणूस हा विद्यार्थी नाही लाभार्थी असतो. कारण त्याच्या पात्रतेवरून त्याचा लाभ भेटतं असतो .नव्या परीक्षेचा पेपर हा कागदाचा नसतो तर तोंडातून निघालेल्या शब्दांचा असतो. मग ते वचन असेल, आश्वासन असेल, कौतुक असेल ,नव्या परीक्षेत नवाचं अध्याय असतो अणि नवाचं निकाल असतो

-


4 MAR 2023 AT 8:51

बाप मेला माझा कोरोनामध्ये
आईला सावरण्याची जबाबदारी माझी होती घरामध्ये,
काळ मुक्काम ठोकून होता,
माझ्या बापाच्या मयतीला सारा गाव आला होता
अग्नी देण्यापासून कार्यसमाप्तीची जबाबारी माझी होती,
लहान बहीण घरात रडत होती,
तिच्या लग्नाची जबादारी माझीच होती
घराचा आधार गेला ..जाता जाता
माझ्यावर मानेवर जबाबारीचा पट्टा टाकून गेला
अशी जबादारीची भूषण गळ्यात पडली
त्या दिवशी मला न रडता काम करायची सवय लागली
जबाबारीच्या ओझ्याने झुकलो आहे
माझ्या स्वप्नांच्या अंर्थुणा घराला शांत झोपवत आहे.

-


3 MAR 2023 AT 20:01

तब सिर्फ समय ही दवा होता है

-


2 MAR 2023 AT 19:19

Are like collaboration of water and milk ,water is transparent which never shade of any effect and milk is nector

-


27 FEB 2023 AT 8:44

व्यसन

काल भेटली जुनी मैत्रीण
म्हणे वकील झाली आहे
माझ्या घरी मात्र अजून
व्यसन नावाची रांड राहिलीच आहे....
घराच्या आधाराला जेव्हा व्यसन लागतं
तेंव्हा घरातील माणसांच्या मनाला भुंगण लागतं....
असता माझा बाप निर्व्यसनी
मी हि झाले असले वकील
आई नसती गेली दुसऱ्यांच्या घरी कामाला
लहान भावाने चॉकलेटसाठी पैसे नसते मागितले मामाला.....
व्यसनाधीन माणसाच्या घरात पैसा राहतोच कुठे?
कधी कोणी येईल दारात हा विषय येतोच कुठे?
आई सांगते माझी....
दारू अफू अणि गांजा फार वाईट बाळा
त्यापायी तुझ्या बापाने विकला मळा
अणि मंगळसुत्राविना ठेवला माझा गळा
लहान भाऊ मात्र नादान आहे
त्याला माहित नाही अजून आपला बाप व्यसनी आहे.
कर्जाच टेन्शन अणि संसाराचा बोजा
हि फक्त कारण होती..
पण आमच्या आयुष्याची मात्र माती होत होती...
देवा नको तुझे मंदिर
नको तुपातला प्रसाद
नको आरतीचा घाट
दे मला फक्त व्यसन नसलेला बाप....
डे मला फक्त व्यसन नसलेला बाप...

-


31 JAN 2023 AT 18:19

झेंडा म्हणजे काय तर केतन, निशाण, पताका काल प्रजासत्ताक दिनानिमित्त लोकांनी हौसेने घेतलेले रस्त्यावरचे झेंडे उचलताना समजलं की झेंडा हा कधी राजकीय पक्षाचा असतो, कधी निषेधाचा असतो, जेव्हा तो किल्ल्यावर फडकावला जातो तेंव्हा तो एकजुटीचा असतो. लाखो वारकऱ्यांच्या खांद्यावर भक्ती भावतून दिसून येतो. पण रस्त्यावर पडलेला झेंडा काय सांगतो ... तो फक्त व्यक्त करतो अपमान फक्त देशाचा नाही तर प्रत्येक मनातील भावनेचा अणि इतिहासाचा जर हा अपमान रोखायचा असेल तर तुमच्या आजबाजूला पडलेले तिरंगे नक्की उचलून घ्या कारण त्या तिरांग्यांसाठी कित्येक लोक जमिनीवर कोसळले आहेत अणि इतकाच काय तर कित्येक बायका विधवा अणि बहिणी आधारहिन झाल्या आहेत

-


20 SEP 2022 AT 0:07

जेव्हा केव्हा वाटेल काहीतरी आयुष्यात काहीतरी माग राहिलय... तेव्हा परत पहिल्यापासून सुरुवात करा..

-


10 FEB 2022 AT 22:30

मन आणि मनाचं

मन आता फक्त मनाचंच ऐकायला लागलय...
रोजच्या धावपळीत मन हरवलंय..
तुटलेलं मन पुन्हा आता जुळलंय..
मनातलं वादळ आता शांत झालंय
कारण मनानं आता मनावर घेणं सोडलंय..
मनातलं लिहायला मनासारखे शब्द भेटत नाहीत..
मन पिंपळाच्या पानासारखं नव्या कोऱ्या वहीत ठेवलंय
मनानं आज हे मनाचं गाऱ्हाणं मांडलय...







— % &

-


Fetching Dr. Gitanjali Abhang Quotes