हातात हात घेण्यापेक्षा ,
हातात घेऊन चाल माझं एक बोट..
डोळ्यांनाच बोलू दे सगळं काही,
उगाच थरथर करतील ओठ..
आवड नसेल western ची तुला ,
तर सांग मला की "साडी नेस.."
केसात माळ मग आणून गजरा,
मी पाठीवर सोडेल मोकळे केस...!-
Real name :- Dnyaneshwari Lad
#Maharashtrian🚩
I wish, dogs live long... read more
बापाचे लाड करता यावेत,
त्याला मिठीत घेता यावं,
त्याचे हट्ट पुरवावे,
त्याला आवडलेल्या पण त्याच्यासाठी त्याने
कधीच न घेतलेल्या अश्या महागड्या भेटवस्तू घ्याव्यात...
त्याला घास भरवता यावा अन्
त्याच्या पोटातलं साठवलेलं सगळं कळावं,
मोकळं करता यावं ..!
त्याच्या आशीर्वादाने एवढं घडावं !
बस् ! 😊-
माझा श्वास थरथरला
तूझ्या श्वासात घुटमळला,
सख्या रे मोह भेटीचा
काही क्षणात विरघळला..
तू ओठांवरी ते ओठ जेव्हा ठेवले होते..
आठवते ? रोमांच अंगावर उभे ते केवढे होते..
बटांना वाटते हल्ली तुझ्या बोटात खेळावे
कधी तू मान चुंबावी कधी कानास छेडावे !
धरुनी हात खेचावा अन् उरी आग पेटावी
पुन्हा आतुरलेली मी मिठीची कैद भेटावी..!-
दुखवट्यांची लखतरे मी झिडकारून टाकते,
वेदनेवर मात करूनी मी खुशाल चालते..
द्वेषाच्या ज्वाळा मज जाळवाया पाहतात,
प्रेमाचा चांदवा मी पांघरून झोपते ..-
मुली आल्यात माहेरी, तरी झालाय का हळवा ?
म्हणे जपल्यात या चिमण्या जिवाच्यापाड बापाने...!-
गुण दोष मान्य करून
जो आपल्यावर तेवढेच प्रेम करतो ..
दिखावा संपल्यावर आणि आपल्यातले चांगले वाइट गुण कळल्यावर ही
ज्याची आपल्याशी नाळ तुटत नाही..
आपल्या चुकांमुळे जो कधी आपल्याला सोडून जात नाही...
तो "आपला मित्र"-
खर्चून पुण्य माझे वरदान हे मिळावे ,
परतून जन्म माझा पोटी तुझ्याच व्हावा !-
That I am sent here, on earth to make this place more worth living 😊
Remind me to laugh and love,
Groom and grow..!-
आतलं काहूर दिसत नसतं दाखवल्याशिवाय,
एका स्वरात,
एका हावभावात,
एका डोळ्यांच्या भिडण्यात
आणि एका हुंदक्यात
मन ओळखणारा,
आणि ते एका क्षणासाठी ही सहन न करणारा
आपल्यावर जीवापाड प्रेम करतो असं समजावं !-
क्यों इतनी खबर रखती हो...?
क्यों मुझे संभालने का सबर रखती हो...?
होगी शायद भगवान से खास भेजी हुई
इसीलिए दिल की बात समझने का हुनर रखती हो !!-