रोखून साऱ्या दुःख- यातना
बाप्पा पुन्हा आलास तू...
वाट पाहिली ज्या क्षणांची
ते क्षण हि घेवून आलास तू..!
निराशेच्या पुराचं पाणी
तुझ्या येण्याने ओझरलं...
मनावरचं ओझं वावडं
तुझ्यामुळेच पाझरलं..!
पुन्हा एकदा होऊन त्राता
तारलेस हे संकट तू...
बेरंगाच्या दुनियेमध्ये
आणलीस पुन्हा रंगत तू...!
बऱ्याच काळानंतर देवा
हसऱ्या चेहऱ्यातून दिसशील तू...
आशा आहे असाच बाप्पा
पाठीशी रे असशील तू..!-
असा तेजस्वी सूर्य उगवला
या भगव्या आकाशात
तद्नंतर मग काही न उरले
मुघलांच्या पाशात..!
स्वराज्याचे धडे गिरवले
जिजाऊंच्या गर्भात
भूमी ला या स्वर्ग मिळाला
होती जी नरकात..!
असे फाडले शत्रू यांनी
जणू नरसिंह अवतार
स्वराज्याचे रोविले झेंडे
असेच अटकेपार..!
रयतेचा राजा तो आणि
शत्रूचा कर्दनकाळ
नाव कोरले ज्याचे हृदयी
तो छत्रपती शिवबाळ..!-
पोशाखाच्या कुंपणांनी
राखला धर्माचा ओपा रे
असाच समजायाला मित्रा
ना धर्म एवढा सोपा रे...!
कुठे काळा हिजाब तो
तर कुठे केशरी गमचे
त्रास कुणाला नाही कशाचा
साऱ्या अफवांच्या वाफा रे
असाच समजायाला मित्रा
ना धर्म एवढा सोपा रे..!
रक्त सांडलं साऱ्यांचं
अन राज्य पळालं गोऱ्यांचं
गोरे गेले तरी राहिला
त्यांच्या विचारांचा खोपा रे
असाच समजायाला मित्रा
ना धर्म एवढा सोपा रे..!
स्वातंत्र्याचे अमृत प्राशित
असे राहिले राष्ट्र अबाधित
माणुसकीच्या भिंती फोडती
या धर्मधांच्या तोफा रे
असाच समजायाला मित्रा
ना धर्म एवढा सोपा रे..!-
तुझ्यापेक्षा गोड
कोणतं चॉकलेटच नाही
कॅडबरी पण नाही आणि
किटकॅट पण नाही...!
पाहून पाणी सुटतं
नुसता खावं खावं वाटतं
खाल्ल्यावाचून माझा तर
जीव लागत नाही
तुझ्यापेक्षा गोड कोणतं
चॉकलेटच नाही..!
तू असलीस चॉकलेट तरी
मेल्ट मलाच व्हावं लागतं
तू जाशील जिथं जिथं
तुझ्या माग यावं लागतं
आल्यावाचून तुझ्या मागं
मला राहवतचं नाही
तुझ्यापेक्षा गोड कोणतं
चॉकलेटच नाही..!
🍫🍫🍫-
वासरांना सोडून गेली
अशी कशी गाय..
ओझरती झाली आता
अनाथांची माय
होईल कोण आता
अनाथांचा केंद्रबिंदू
येईल का परतुनी
पुन्हा माय सिंधू..!-
नवीन वर्ष हातातल्या
रेती सारखं सुटत जात
सरत्या वर्षातल्या सगळ्या
आठवणींना लुटत जातं..!
सुरवात होती अपेक्षांची
काही पूर्ण काही अपूर्ण
जगलो आपण मनभरून
हेच खरं सत्य सम्पूर्ण..!
दिवस वाईट बेताचे
चांगले सुद्धा काहीसे
सरले वर्ष असे क्षणात
झाले बघता बघता नाहीसे..!
एक कळालं या वर्षात
आपण फक्त लढायचं
दिवस जातात बदलून नक्की
फक्त चिंतेत नाही पडायचं..!-
सहवास तुझा मज
वाटे ऊब ती हवीशी
गोठलेलं मन माझं
धाव घेई तुजपाशी
वाटे ऐकत राहावी
तुझी तीच बडबड
थांबायला तुजपाशी
सारी माझी गडबड...!
हाक तुझी सुरातली
मला ठेवते बांधुन
दूर असून तुझ्यात
मला ठेवते डांबून...!
कैद हवीशी तुझीच
नको मला ही सुटका
नाही सहवास तुझा
नको मज ती घटिका..!-
पाऊस हा अकाली
अन नास धुस झाली
शेती ही पोसलेली
सारी भकास झाली..!
घ्यावे किती मी कष्ट
काहीच कळत नाही
का निसर्ग हा दुष्ट
उत्तर हे मिळत नाही..!
काय झाले हे तुला रे
का वागतो तू तुटका
या तुझ्या वागण्याचा
आम्हा शेतकऱ्यांना फटका..!
यात तुझा दोष काय
तू फक्त ते निमित्त
आमचेच कर्म सारे
तुझी बदलण्यास रीत..!
कोपु नको तू आता
तुझं विनवणी असावी
हि बळीराजाची धरणी
अशी भकास नसावी..!-
माझ्यातल्या भक्तीचा
मी काय सांगू अंत
पंढरीचा विठुराया
असे माझा भगवंत..!
केसरी गंधाची
माझी सुवासिक भक्ती
मुखी हरिनामाची
माझ्या श्वासानाही सक्ती..!
असे मनाला या ओढ
भेट व्हावी तंतोतंत
पंढरीचा विठुराया
असे माझा भगवंत..!-
"खुन एक है
इस देश का
बस मजहब
बदनाम है..!
जो मजहब से
सोचे आगे
उस सोच का नाम
कलाम है..!"-