एकमेकांच्या मनाला
माफ ही
करता आले पाहिजे
आणि
साफ ही... 💝💘💖!!!-
शब्दांची सांगड घालताना
अक्षरांना समजून घ्यावे
प्रेमात रंगून जाताना
भावनांना हरवून जावे
-
जो पर्यंत मुलगा बाप
आणि
मुलगी आई होत नाही
तो पर्यंत त्यांची किंमत समजत नाही-
#बापमाणूस #
शब्दातही न मावणारा
प्रेमातही न पुरणारा
वादळांनाही धुडकाविणारा
संकटानाही तुडविणारा...
शब्दांत बसतच नाही बाप माझा !!
@ काव्यदिप
-
प्रत्येक यशाचे शिखर सर
करण्यासाठी
"बाप"या नावाचे असणे
जीवनात
खूप महत्वाचे आहे-
कधी-कधी आपल्याला हवहवंस
वाटणारं माणूस परत नको-नकोसा का वाटतं ?
जिचा आवाज एेकण्यासाठी जीव आतुर झालेला असतो
तो आवाज परत नको-नकोसा का वाटतो ?
जिचा चेहरा दररोज पाहावासा वाटतो
तो चेहरा परत नको-नकोसा का वाटतो ?
जिचं भेटणं मनाला आनंद देणारं असतं
ते भेटणं परत नको-नकोसा का वाटतं ?
जिच्यासोबत संपुर्ण वेळ घालवायला आवडायचं
तो वेळ पण परत नको-नकोसा का वाटतो ?
जिच्या बोलण्यामुळे आपल्यात बदल झालेला असतो
ते बोलणं ही आता नको-नकोसा का वाटतं ?
कधी-कधी आपल्याला हवहवंस
वाटणारं माणूस परत नको-नकोसा का वाटतं ?
- काव्यदिप
-
जीवनाच्या प्रवासाची
ही वाट दूर जाते
हरवून मनाला त्यात
शोध तिचा घेते-
प्रत्येकाला कर्माची फळे
इथे भोगावी लागतात
आयुष्याच्या उलाढाली
खूप काही सांगून जातात
- काव्यदिप
-