" If plan A fails
you have 25 letters."
-
" लहानपणी बाळ
आईच्या कुशीत सुरक्षित असते.
आणि म्हातारपणी आई
मुलाच्या घरी सुरक्षित असते."
-
" शून्यातून विश्व निर्माण करता येते
आणि सर्व काही मिळवलेले
क्षणात शून्य करता येते.
शेवटी निर्णायक तुमचे कर्म."
-
" काही नीतीशून्य माणसे
अशा शुन्यासारखी असतात
ज्या अंकासोबत येतात
त्याचीही किंमत शून्य करून टाकतात."
-
" जेव्हा एखाद्या व्यक्तीला
एखादी गोष्ट पसंत नसते,
तेव्हा ती गोष्ट पुन्हा न करणे
हाच निर्णय शहाणपणाचा.
तुम्ही त्याकडे दुर्लक्ष करून
वेळ काढून नेऊ शकतात पण
व्यक्ती म्हणून तयार होणारी
तुमची भिकार प्रतिमा
तुम्ही कधीच पुसू शकत नाही."-
" पाप-पूण्याच्या धर्मशास्त्रातील संकल्पना
मी जाणत नाही
पण तरीही वाटते एखाद्याच्या
असहाय्यतेचा गैरफायदा घेणे
जगातील सर्वात मोठे पाप असावे."
-
" ज्यांना कळतात त्यांना
मुक्या जनावरांच्याही वेदना कळतात.
पाषाणह्रदयी लोकांना मात्र
आपल्या कुटुंबातील सदस्यांचे
कण्हणे देखील ऐकू येत नाही
कारण फरक असतो तो काळजाचा.
काहींचे काळीज प्रेमळ असते
काहींना काळीज नसते तर
काहींना असते पण
उलटे."-
आई
" आईचा स्वाभिमान
माझा स्वाभिमान आहे.
कारण माझे अस्तित्व
तिच्या अस्तित्वापेक्षा वेगळे नाही."
-
औरों के बारेमे सोचने की आदत
Confuse कर देती है।
सिर्फ हमें क्या चाहिए यही सोचते तो
हम भी firm होते।
-