कोवळ्या सकाळी उभी समोरी,
जशी वेलीवर फुलली चमेली,
रूप तुझे साठवावे लोचणी हे...
सावरताना बट डोळ्यावरची,
कटाक्ष माझ्यावर टाकलास तू,
नजर तुझी त्यात,जीवघेणी आहे...
उठती तरंग हृदयात माझ्या,
कैद झालोय नजरेत तुझ्या,
पुकारली श्वासांनीआणीबाणी आहे.
असावेस अशीच हसरी समोर,
नाही भेटली कधी तरी तू दिसावे,
मनातून एवढीच मागणी आहे....
@dpb-
pcolor1512
रातभर तगमग चालली,
या कुशीवरून त्या कुशीवर,
प्रहर सरता सरेना...
पापणीत ओल जागी,
श्वासात आवंढा दडलेला,
डोळ्याला डोळा लागेना...
अंधार डोकावतो मनात,
रात्र वैरी की झोप वेडी,
नाते कळता कळेना...
@dpb-
एकांतात तूच असतेस,
माझ्या सोबतीला ....
शब्द हरवला तरी,
श्वास असतो संगतीला....-
तुझ्या गल्लीतून जाताना,
जाग आठवांना आली...
मनात गाव जागे झाले अन्,
गर्दी पाणवठ्यावर झाली...
रंग सांडलेले क्षितिजावर,
कोणी रांगोळी ही काढलेली..
प्रतिमा तुझी मधेच दिसते,
जणू मुद्दाम तेथे सोडलेली...
सभोवार पसरलेली हिरवळ,
पाऊलवाट मधून घराकडे चाललेली...
ताटवे फुलांचे हे फुललेले,
एक एक आठवण त्यात फुललेली...
तेच घर, तीच वाट , तीच तू,
आज नव्याने अशी आठवली...
वाट पुढे चालताना उगीच,
पापणी माझी नकळत ओलावली.....
@dpb
-
तुझी आठवण,
डोळ्यात पाणी आणते....
कळत नकळत ,
बंध आपल्यातले घट्ट बनवते...-
रोज उगवतो चंद्र नवा,
आकाश माझे जुनेच आहे...
नक्षत्र अन् चांदण्या नव्या,
त्यात तुझी उणीव नक्कीच आहे...-
आयुष्य क्षणक्षणाला
"कमी"होतंय,
कामाच्या व्यापात मात्र,
आम्ही म्हणतो "जगतोय"...
"पासबुक"भरत चाललंय,
रोज बॅलन्स वाढतोय,
"श्वास" कधी ब्रेक होईल,
हे कोण जाणतोय?.....
पैशांचा जमाखर्च ,
कालचा आजचा जुळतो,
क्षणा क्षणाला मात्र,
एक एक श्वास वजा होतोय.....
एखादी वस्तू,पैसे , सोनं,
हरवलं तर मन होतं बेचैन ,
काळाचा कावळा मात्र,
आयुष्याच्या माठातलं पाणी पितोय...
प्रवास आपला असा,
नाही माहित कुठे थांबणार ,
"अवशेष" बणण्यापूर्वीच,
त्याला जो तो "विशेष"बनवतोय.....-
तुझी बासरी,
मन माझं व्याकूळ...
तुझ्या रासलीला,
आनंदी गोकुळ...
तूच सखा तूच हरी,
तूच माझा मित्र...
तुझ्या स्मरणात,
सुखी जीवनाचे सूत्र...-
मिळालं सारं काही जगताना येथे,
स्वप्न बघणं आता सोडलंय मी...
आहेत येथे जिवलग सारेच माझे,
परक्यांना गांजरणे थोडं सोडलंय मी...
ज्यांना समजत नाहीत व्रण जखमांचे,
घाव हृदयाचे दाखवणं सोडलंय मी....
चेहऱ्यावर आहेत भाव माझ्या मनातले,
दिखव्यासाठी उगीच हसणं सोडलंय मी...
जपतो ज्यांना आहे ओढ माझ्या मैत्रीची,
नाराजांची खुशामत करणं सोडलंय मी...
@dpb-