आयुष्यात काही गोष्टी नाही मिळाल्या तरी, त्या पूर्णपणे मनातून डिलीट करता आल्या असत्या तर बरे झाले असते, निदान पुन्हा पुन्हा मनात डोकावून त्या त्रास तरी देऊन गेल्या नसत्या....
-
हम अकेले नहीं होते, हमारा दिल हमसे हर वक्त बाते करता हैं, उनकी भी बातें करता है, जो हमें अपना नहीं समजते....
-
इन्सानियत का त्योहार है ये
हमे इन्सानियत सिखाता हैं
सभी भाई-बहनों को हमेशा
मानवता की राह दिखाता हैं
-
आईनेच गर्भामध्ये मला नऊ
महिने नऊ दिवस सांभाळले
तीच माझा पहिला गुरु
तिनेच जग दाखविले ॥१॥
बाबा माझे मजसाठी येथे
पहिले मार्गदर्शक लाभले
त्यांच्यात छत्रछायेत मला
सद्गुणाचे दर्शन घडवले॥२॥
ताईच माझी बहीण शोभली
तिनेच बालपणी सावरले
ताईचे बोट धरून मी
पहिले पाऊल शाळेत टाकले॥३॥
गुरुजी मजला येथे
दीपस्तंभसम थोर भेटले
माझ्या साऱ्या आयुष्याचे
परिसस्पर्शाने सोने झाले॥४॥-
गुरु असावा बुद्ध-कबीरासम
तयांनी समतेचा संदेश द्यावा
सकल जनांच्या उद्धारासाठी
आपला जीवनमान संपवावा॥१॥
आई असावी जिजाऊसम
मूल्यांची शिकवण तिनं द्यावी
पुत्र असावा शिवरायासम
तयाने स्वराज्य स्थापना करावी॥२॥
पती असावा ज्योतिबासम
दीनदुबळ्यांचा आधार व्हावा
पत्नी असावी सावित्रीसम
तिनं पतीचा वसा घ्यावा ॥३॥
पिता असावा रामजीसम
पुत्र भीमरायासम जन्मा द्यावा
प्रज्ञासूर्यासम तळपत तयाने
मानवजातीचा उद्धार करावा॥४॥-
इन्सानियत का त्योहार है ये
हमे इन्सानियत सिखाता हैं
सभी भाई-बहनों को हमेशा
मानवता की राह दिखाता हैं
-
तुझ्या भांगेत ज्या दिवशी कुंकू भरले,
त्याच दिवशी तुला मी
माझ्या आयुष्यातले सर्व अधिकार दिलेत.
काय करायचे ते आता तूच ठरवं,
मला सर्व काही मान्य असेल....-
तुझ्याच सोबतीने मला सखे
आयुष्य हे जगायचे आहे....
तुला सुखाचे क्षणा देण्यासाठी
मला जन्मभर झिजायचे आहे
तु नसशील आयुष्यात माझ्या
तर हे जगणे मला नको आहे
श्वासाच्या अंतापर्यंत सखे मला
तुझ्या सुखासाठी जागायचे आहे-