.......
-
तितक्यात एक साधारण 5 ते 6
वर्षाची मुलगी आली
आणि म्हणाली
" दादा तू खूप छान कविता लिहतोस.
मला खूप आवडली तुझी कविता"
मी thank you म्हटलं
आणि ती छोटी मुलगी निघून गेली
मनात म्हटलं
"मी कधी कविता म्हटली "
हे खूप विलक्षण होतं आणि थोडं
वेगळंही!
[1]To be continued...
Remaining only 6 parts.-
पाहिलं तर गर्दी फार होती
मागून तिसऱ्या रांगेत एक खुर्ची रिकामी होती
तिथं बसून मी इतरांच्या कविता ऐकू लागलो.
असं मी बऱ्याचदा केलेलं
कविता लिहायच्या आरश्यासमोर
प्रॅक्टिस करायची
आणि संमेलनात येऊन
इतरांच्या कविता ऐकून घरी जायचं.
नेहमी प्रमाणे आजही तसंच झालं
संमेलन संपलं
मी बाहेर पडलो
मनात स्वतःशीच बोलत होतो
"शीट यार आज गेलं पाहिजे होतं स्टेज वर"
[1]-
[इथून पुढे फक्त Past आहे ]
दिनांक :17 मार्च 2014
मी खूप छान कविता लिहायचो
आधी चित्रकला छान होती
मग कवितांनी वेड लावलं
आणि तरुण वयात जरा
अजूनच सुचतात तसं झालेलं
एक कविता लिहली होती
आणि जमेल तितकी फोल्ड करुन
मी त्यादिवशी तिसऱ्यांदा
कवी संमेलनात गेलो.
[1]-
दिनांक :27 एप्रिल 2022 12:30 am
रात्री 12:30 ला
Whats app ला Messsge येतो
"संपलंय सगळं, झालं गेलं विसरून जा
आपण नाही एकत्र राहू शकत "
Reply न देता
मोबाईल दूर ठेवत
मी झोपण्याची तयारी करतो.-
आठवत सारं पुन्हा
पून्हा उठावसं वाटत नव्हतं
लागलं बरंच होतं
रक्त वाहत नव्हतं
हा तोच होता
जो विलक्षण होता
अगदी स्वभावाने
आणि विचाराने
आज मात्र खूप खचला
आज थोडा निराश होता
नियतीने खेळलेल्या डावाने
पण बदलेल मित्रा
आजची रात्र संपून
उद्या तुझा आहे
अंधारात भिती असेलही
मात्र प्रकाशाच्या तेजापुढे
अंधकारही परास्त्र आहे.-
तो
खूप अशांत होता आज
मनात काहूर माजलं होतं
व्यक्त व्हायचं नव्हतं
पण काय करू त्यालाच कळतं नव्हतं
भिती अंधाराची नव्हती
अंधुक प्रकाशाची होती
जो वाट दाखवत ही नव्हता
फक्त आभास करत होता
ओरडावं वाटतं होतं
मनात खूप काही होतं
आसवांचे थेंब होते हातावर
जवळ मात्र कुणीच नव्हतं-
आयुष्याच्या प्रवासात
सर्व काही भेटतं
कधी लवकर तर कधी उशीरा !
या अशा अनेक गोष्टी
अनेक घटना साठवत
नातं जपायचं अधिक घट्ट करायचं
चुका होतात त्या स्वीकारून
पुन्हा चालायला लागायचं
आणि कधी
नाव सुचलं नाही
तरी चालेल
मात्र आयुष्य मनमुराद
जगायचं.
The End.-
हेच असतं आयुष्य
असेच असतात कडवट अनुभव
परंतु
एक सत्य विसरलं जातं
प्रत्येक सकाळ नवीन
काहीतरी देऊन जाते
ज्याची अपेक्षाही नसते
तेदेखील पदरात पाडते
एक वळण संपत,
दुसरं काही वेळाने चालू होतं
घडत जातो बदल
आपणही थोडं बदलतो-