मुकद्दर में लिखा जो नसिब का पन्ना था
फाड ही दिया जो तकदिर का पन्ना था
यु तो किस्मत का लिखा वो
में लिखता मिटाता रहा मगर
किसी के दस्ते तलब में रहा
किसी की हरफे दुआ में रहा
में नसिब था किसी और का
मुझे मांगता कोई और था ...-
एकांतप्रिय माणसाला कवटाळते शांतता
त्या आर्त सुरांमधूनही किंचाळते शांतता
एकाकी आयुष्याला जोडणारा दुवा हवा
शांततेला भेदनाऱ्या सुईलाही धागा हवा
खळाळणाऱ्या दरीयाला देऊन किनारा
रुसलेल्या मनाचा पिऊन प्याला
तू सुरांच्या सप्तकाचा सोपान हो
महा - महारथी चा होऊन सारथी
तुझ्या मनाच्या रथाचा गोपाळ हो
तू सुरांच्या सप्तकाचा सोपान हो-
धुंद चांदण्यांचे की त्या अबोलीच्या फुलांचे
पंख पसरूनी कवेत घ्यावे जग आकाशाचे
आता मोह कळ्यांचा गुलाबास फार होतो
मग मोहरल्या वृक्षालाही भार फार होतो
नविकाच्या होडीने ही सागरा पार जावे
स्वार होऊनी लाटांवरती पार पार जावे
अंतरातली गाठ सुटावी मोह सारे सोड तू
डोळे भरुनी दिसेल तुजला जग हे नक्षत्रांचे
- धवल-
वादियों में इत्र की मेहेक ढुंढता हुं
में खाली कमरे में जुगुनु ढुंढता हुं
गरजके जो फिरसे बरस जाए वो
पेहली बारिश में मित खोजता कोई मोर हो मानो
में कोयल की कूहुक में बिसरा गीत बन जाता हुं
बादलों में उडते परिंदो के शौक ढुंढता में
गीत नया गाता हुं, गीत नया गाता हुं.....
- धवल-
इत्र सा महिनों का सदियों सा इंतजार...
और मुठ्ठी में बंद फिसलती रेत सी मुलाकात
होना चाहिए जिसे वो नाराज होकर भी लगता नहीं
जो नही हे वो ना होकर भी लगता हे की नाराज हें
ता उम्र सभी से यही शिकायत रही...
जो हो कर भी नहीं था वो कहेगा नहीं
और में केह भी दू तो लगेगा नहीं...
बात सिधी हे की वो केहना चाहेगा नहीं
और में चाहुंगा फिर भी कभी कहुंगा नहीं
-
कहानी बनी किरदार बने
रांझा बन गया कोई
ना चांद मिला ना हिर मिली
मोहन बन गया कोई
ना घर भाये ना अंगण भाया
दोस्त मिले फिर कई
गोकुल भया ना राधा मिली
बस बन्सी बजाए कोई
- DhavaL...-
रात्रीच्या सोबतीलाही अमावस्येचा डाग असतो
एकांतातल्या गुजगोष्टी आठवणींचा बहर असतो
आयुष्याची बाग कायमच बहरलेली असते मित्रा
स्वप्नातला चंद्रही कधीकधी झाकोळलेला असतो
-
कलुषितांच्या विषाने चौरस वेढीयेला
शकुनी दुर्योधनाचाही डाव साधलेला
अहंकाराचा अन् इर्षेचा बाण बनवुनी
पार्थाच्या माथी एक कलंक मारीलेला
-
अबोल भाव तुझा मनास भावला होता
तुझ्याशी बोलताना चंद्र ही हसला होता
जाणिवांच्या ओझ्याखाली झाली भेट होती
बोलताना तुझ्याशी मग दाटली भीती होती
नजरेच्या धुंदीने माझे हसले शब्द होते
निशब्द बोलके ते हसरे तुझे डोळे होते
ओठांवरती शरमेचा तो गुलाब हसरा आहे
उत्कंठेचा आवेगाचा आठवणींचा झरा आहे
आवरू कशी या आवेगाला भाव तुझा होता
वर्षांच्या प्रतिक्षेचा अन् आसवांचा झरा होता
प्रेमभराने व्यक्त झाला दिवस सुद्धा रिता झाला
शब्दांच्या संध्याकाळी केवढा तो पाऊस झाला
-धवल पठारे...
-
माझ्या उदास प्रश्नचिन्हावर ????
तुझ्या स्माईल चा जवाब असतो
रुसवा घालवण्यासाठी, ओठांवर
तुझ्या ओठांचा गुलाब असतो 😘
-