Devanand Jadhav   (©•देवानंद जाधव~धामणीकर•)
0 Followers · 5 Following

Writer / Poet / Lyrist
Joined 13 January 2024


Writer / Poet / Lyrist
Joined 13 January 2024
24 APR AT 22:58

मिष्कीली...

तू ही भाडं खाऊ
अन् मी ही भाडं खाऊ
दोघेही खातो भाडं
म्हणूनच भाऊ भाऊ

-


18 APR AT 11:04

तुझ्यावरचं प्रेम देखील
माझं अधुरच राहिलं
भेटणं असं झालंच नाही
मन, आजही वाट पाहत बसलं

-


18 APR AT 9:51

तुझ्यावरचं प्रेम देखील
माझं अधुरच राहिलं
भेटणं असं झालंच नाही
मन, आजही वाट पाहत बसलं

-


11 APR AT 0:08

आयुष्य म्हणजे काय...?
हे त्या गरिबाला विचारा, जो त्याची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी; स्वतःचा श्वास सुद्धा फुग्यात भरून विकतो!

-


7 APR AT 21:05

मारुतीच्या ओट्यावर
ती बोरे घेऊन बसायची
पाच दहा पैसे वाट्याने
आंबट गोड 'स'गुणानंद द्यायची

-


6 APR AT 17:54

निवडणुकीचा उडणार बार
फिरतील उमेदवार दारोदार
तिकिटासाठी सगळेच आतुर
मिळेल ज्याला तोच महाचतुर
जागे रहा रात्र थोडी नि सोंगे फार
इथे जागा कमी नि पक्ष मोकार
देतील आश्वासनांचा महापूर
दिसेल चहूकडे एकच सुर
निष्ठावान म्हणून मिरवणार
पण...
विश्वासाची असणार मारामार!

-


1 APR AT 7:47

एकत्र राहाणे म्हणजे नुसते "एकमेकांबरोबर" जगणे नव्हे तर "एकमेकांसाठी" जगणे!

-


27 MAR AT 22:04

सत्तेच्या सारीपाटात
कैकांनी पक्ष बदलला
उठावळांच्या बाजारा
उंडगीला शेजार भेटला...

-


23 MAR AT 23:58

राग लोभ मत्सराची आज करुया खांडोळी
जात पात द्या आहुती चला पेटवूया होळी
ऋतू वसंत घेऊन सण शिमग्याचा आला
ज्वाला त्या धगधगती पहा कशा गगनाला
हेवे दावे विसरून दूर सारू वैर भाव
सर्व धर्म एक मानू सोडू सारे भेदभाव
भांग पिऊ प्रेमरूपी नशा चढवू नेकीची
बोबो बोबो बोंब मारू मिठी मारुया एकीची
नांदू गुण्या गोविंदाने रंग रंगात मिसळू
निळा भगवा हिरवा चला आनंदाने खेळू
हाच असे क्षण खरा चला खेळूया रे होळी
गोड धोड भरू मुखी आज पुरणाची पोळी

-


23 MAR AT 21:24

शाळे जवळच रोज
हातगाडीवर बसायचा
दहा पैशाच्या भेळीत
'पुरी' भूक भागवयाचा

-


Fetching Devanand Jadhav Quotes