भुकेल्या पोटाला कोंड्याहुन महान काय नसते..
सुकलेल्या मातीला पहा विचारुन तहान काय असते..
दिप्ती..*-
निघालिया वारी..
विठोबाच्या दारी..
फिरे न माघारी..
वारकरी||
तुळस धरी माय..
थकती न पाय..
मनी विठुराय..
नांदतसे||
रंगे भक्तीरंग..
उच्चार अभंग..
वाजतो मृदुंग..
जल्लोषाचा||
न लागे काही गोड..
चिंता मागे सोड..
मनास या ओढ..
पंढरीची||
-दिप्ती..-
मांडुन डाव..
भांडुन थोडे..
सांडुन गेले..
क्षण जुने..
आठवणी व्यतिरिक्त..
राहिल्या रिक्त..
चार भिंती..
कोपरे सुने..
**दिप्ती..-
आठवीच्या वर्गात असताना PT च्या तासानंतर झालेल्या मधल्या सुट्टीत तू मला व्हरांड्यात बोलावल पण मला दम लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी मी जरा जाऊन येते बोलुन गेले आणि यायलाच विसरले परत..
'ते काय होतं '...
एका दमात तिने संदर्भासहित स्पष्टीकरण मागितलं..
.........
"इतक्या वर्षानंतर हा प्रश्न तुला आता पडतोय ह्यातच सगळ आलं.."
त्याचं एका वाक्यात उत्तर..
आजही दोघांना
.......रिकाम्या जागा.......भरताच नाही आल्या..
--दिप्ती जाधव..-
हे खरे की विषाहून जहरी होते..
पण..तू दिलेले दु:ख भरजरी होते..
- दिप्ती जाधव..-
माणसं 'आइसबर्ग' सारखी असतात..
जितकी वर वर दिसतात..
त्याहुन तळाशी जास्त खोल असतात..
म्हणुन..
तळाचा अंदाज आधीच घ्यावा..
नाहीतर 'टायटॅनिक' सारखी दुर्दशा व्हायला..
वेळ नाही लागत..
_दिप्ती जाधव..-
करा कितीही मने न दुखण्याची शर्थ येथे..
हरेक शब्दागणिक बदलती अर्थ येथे..
-
वर्ख लावा सुखाचा वा मलमली कपड्यात ठेवा..
दंश विषारी जीवघेणा हाच धर्म वेदनेचा..
-
!!विठ्ठला!!
ऐक तू.. उन्हास आवर..विठ्ठला!!
ह्या ढगाला सावळा कर..विठ्ठला!!
कळत नाही कोण आहे आपले..
भरवसा ठेवू कुणावर..विठ्ठला!!
चोर ही वारीत होते रे तुझ्या..
हद्द झाली ना अता तर..विठ्ठला!!
बाप अनवाणी निघे का रोज रे..
तोडगा देशील ह्यावर..विठ्ठला?!!
वीट पायाशीच आहे जर तुझ्या..
बेघरा देशील का घर..विठ्ठला!!-
विंगेत जाऊन नसतात करायच्या
चर्चा परिच्छेदावर..
परिक्षा हॉलमध्ये गेलं की..
हातात प्रश्नपत्रिका आल्यानंतर
नसतात लावायचे संदर्भ..
पाचव्या पानावरच्या चौथ्या ओळीचे..
अखेरचा क्षण संपवतात सारे मार्ग..
तेव्हा रडायच नसतं..
फक्त लढायच असतं..
-