Deepika Bangar   (Deepsandhya)
5 Followers · 3 Following

Joined 19 January 2023


Joined 19 January 2023
17 HOURS AGO

तू आणि फुल
तुझे रूप पाहताना वाटतं,
उमळणारी कळी पाहत आहे.
तुझे हसणे पाहताना वाटतं,
डोलणारे फुल पाहत आहे.
तुझे मन पाहताना वाटतं,
उत्साह देणारा पुष्पगुच्छ पाहत आहे.
तुझ्यातील शौर्य पाहताना वाटतं,
फुले ऊन,वारा,पाऊस यापासून स्वतःला सावरताना पाहत आहे.
तुझे इतरांसाठी जगणं पाहताना वाटतं,
कोमजण्याची भीती न बाळगता फुलं नेहमीच आपला सुगंध सर्वत्र पसरवतात.
✍️ दिपसंध्या.....
दिपीका निलेश गोरले

-


28 APR AT 2:17

उराशी दुःख असतानाही,
समाजात वावरताना आनंदी असल्याचे भासवावे लागते.
दुसऱ्यांच्या सुखात सुख शोधणाऱ्यांनाही,
नेहमीच त्यागाची भूमिका स्वीकारावी लागते.
✍️ दिपसंध्या....

-


26 APR AT 1:33

सखीने माझ्या अबोला धरला,
खोल वार जणू काळजात झाला.
रुसवा असा तिने मनात जपला,
की अर्ध्यावरती प्रितीचा डाव मोडला.
✍️ दिपसंध्या...

-


25 APR AT 17:26

आज आपण स्वतःच्या मी पणात इतके हरवलो आहोत,
की ज्याच्यासाठी वैभव संपन्न झालो त्यालाच विसरलो आहोत.
✍️ दिपसंध्या...

-


24 APR AT 16:33

कितीही तुला विसरायचं म्हटलं तरी विसरता येत नाही,
स्व नयनातील आसवांना रोखता येत नाही.
मैत्रीची तुझ्या मी बरोबरीच कोणाशी करू शकत नाही,
तुझ्याविना जीवनात माझ्या मैत्रीची जागा अपूर्ण राही.
✍️ दिपसंध्या.....

-


23 APR AT 19:56

कधी कधी मन मोकळं करण्यासाठी,
कोणी तरी सखी समीप असावी.
की तिच्या नुसत्या असण्यानेच,
मनात सुखाची कळी फुलावी.
✍️ दिपसंध्या...

-


22 APR AT 17:41

निस्वार्थ प्रेम म्हणजेच ती आपल्याला आयुष्यात
कधीच भेटणार नाही हे माहीत असतानाही प्रेम करणे.
आणि तिच्या सुखासाठी तिच्याही नकळत,
समाजाशी झगडण्यास नेहमीच तत्पर असणे.
✍️ दिपसंध्या...

-


21 APR AT 18:20

जीवनात विविधरंगी रंग भरून,
कसं जगायचं हे जिने शिकवलं मला.
तिने तिच्याशिवाय मी कसं जगायचं,
हे शिकवायलाच ती नेमकी विसरली मला.
✍️ दिपसंध्या...

-


20 APR AT 19:06

जो तू समजतेस तो मी कधीच नव्हतो,
मी होतो मुक्त मयूर नभी फिरणारा.
कधीच तुझा होऊ न शकणारा,
तरीही तुझ्या अंतरी राहणारा.
✍️ दिपसंध्या....

-


19 APR AT 18:11

तिच्या नसण्याने आता मला फरक पडत नाही,
किंवा असण्याने ही मला फरक पडत नाही.
कारण मनातली जखम हळुवार बाजूला करून,
मी पुन्हा आज जगायला शिकलो आहे.
✍️ दिपसंध्या...

-


Fetching Deepika Bangar Quotes