ओस जाल्या दिशा मज भिंगुळवाणे |
जीवलग मज नेणे कोणी ||
अंधकारापुढे न चलवे वाट |
लागतील खुंट कांटे अंगा ||
- तुकाराम-
आपल्या मुलांवर निःस्वार्थ प्रेम, अनंत उपकार करणाऱ्या आईबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना तुकाराम म्हणतात,
लेकराचे हित | वाहे माऊलीचे चित्त ||
ऐसी कळवळ्याची जाती | करी लाभेविण प्रीती ||
पोटी भार वाहे | त्याचे सर्वस्व ही साहे ||-
रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग |
अंतर्बाह्य जग आणि मन ||
- तुकाराम-
ही भूमी हा नरक असे,
वदे अदय दिन वारंवार !
ही धरणी हा स्वर्ग असे,
गाते रजनी, जी प्रिय फार !!-
मी नास्तिक का आहे? असा लेख भगतसिंगने लिहिला आहे. त्यामध्ये तो धर्माची विज्ञानवादी चिकित्सा करुन देवाचे अस्तित्व नाकारतो.
आज कोरोनासारख्या जागतिक संकटाच्या वेळी तो लेख अधिकच महत्वाचा वाटतो. लाखो रुपये खर्च करुन उभारलेल्या मंदिरापेक्षा हॉस्पिटल अधिक महत्त्वाचे असतात, हे वास्तव आज कोरोनाने सिद्ध केले आहे. माणसाला नैसर्गिक संकटाच्या वेळी फक्त विज्ञानच मदत करत असते. धर्म, देव हे माणसाला फक्त अज्ञानात ठेवून पलायनवादी बनवत असतात.-
आज जागतिक कविता दिन...! कवि मानवी मनाचा प्रतिनिधी असतो. कवी तुमच्या-आमच्या मनातील भावनांना शब्दांनी प्रकट करतो. कवीचे महत्त्व सांगताना इमर्सन म्हणतो,
The experience of each new age requires a new confession and the world seems always waiting for the poet.
प्रत्येक युगातील अनुभव व्यक्त व्हावा लागतो व त्यासाठी जग नेहमीच एका कवीची वाट पाहत असते.-
होळीच्या हार्दिक शुभेच्छा...!
होळीचा अर्थ काय? काय जाळायचे? ती लाकडे, त्या गोवऱ्या म्हणजे काय? खरे म्हणजे आपल्या मनात बसलेल्या सर्व वाईट गोष्टी आज बाहेर काढून त्यांचे भस्म करायचे असते. मनातले जमलेले सारे बरबट आज बाहेर फेकायचे. निर्मळ व्हायचे. तो होम म्हणजे व्यक्तीच्या जीवनातील, सामुदायिक जीवनातील जे जे वाईट त्याचे त्याचे भस्म करणे होय. अज्ञान, भेद, आलस्य, भीती, भांडणे, भोगवासना, स्वार्थ नाना दुर्गुणांचे प्रतीक म्हणून एक गवताचा पुतळा करावा, त्याचे भस्म करावे.
- साने गुरुजी-