चित्रा पगारे   (@Chitra_pagare)
66 Followers · 46 Following

read more
Joined 3 January 2019


read more
Joined 3 January 2019

सांभाळून मने सगळ्यांची
कुठलाच हिशोब जुळत नाही
इच्छा मारल्या कित्येक मी स्वतःच्या
आयुष्याचा अर्थ खरेच कळत नाही

समजदार होऊनि कित्येकदा
स्वीकारले खळगे वाटेवरले
का इतके धडे माझ्याच वाटयाला
नशिबा आता कळत नाही

ना मोजले कधीही सुख इतरांचे
कणभर सुखावर माझ्या भाळले मी
वाटेत पाहून कित्येक हकदार फुलांचे
काट्यांच्या वाटेला कधीच रुसले नाही

-चित्रा भारत पगारे, जळगाव

-



चिलखतं घालून जगायचं या जगात,
समोरून येणारे वार झेलण्यासाठी नाही
तर
आत काळजावर झालेल्या जखमा
या जगाला दिसू नये म्हणून
कारण जखमा दिसल्या की,
पुन्हा त्याच जखमा ओरबाडून काढायला हे जग तयार असतं
म्हणून चिलखतं घालून तसंच निःकाळीज होऊन जगायचं
_चित्रा पगारे



-



खूप प्रश्न पडली आहेत आयुष्या
सांग ना कुठं शोधू
कुठल्या पानावर उत्तर आहेत ती,
पान चाळल्यावर मागचंच सापडत ,
पुढे गेलं की मात्र मागे त्याच पानावर वळता येत नाही.
पुन्हा ते जगता येत नाही.
फक्त वेदना यासाठी होतात की
ती मागची पानं ,फाडताही येत नाही
अन् पुढच्या पानावर काय आहे,
हे वेळ आल्याशिवाय कळत ही नाही....

-



चलो ना फिर से सब नया कर देते है|
बस ये जमीं और आसमाँ वही रखते है|

-



अधुरे ख्वाबों को पुरा करने के लिए
खुद को जिंदा रखना पडता है|
और खुद को जिंदा रखने के लिए,
कुछ ख्वाबों में जीना पडता है|

-



आपल्याला पाहिजे तेव्हा
आणि पाहिजे तसं आयुष्यात कधीच घडत नाही,
पण आपल्याला मात्र आयुष्याप्रमाणे
स्वतःला घडवावं लागतं..

-



काळजावरच्या घावांनाही माहित आहे तुझे नाव....
मात्र आरोपी म्हणून सजा द्यायला मन तेवढे तयार नाही

-



Never fight with life,fight with problmes of life and start to live the life.

-



Life is nothing but what you react in turn to the situations_chitra pagare

-



तो 'एक क्षण'...... जिथे,
दिवस मावळतीला येतो.....
अन् दिवसभर सोबतीला असणारा सू्र्य
मावळायला तयार नसतो....

पण नेमके त्याच कातरवेळी.....
ती 'संध्या' येण्याच्या गडबडीत असते....
आणि जसा तो या दोघांना जोडणारा नेमका 'एक क्षण' सापडत नाही ना!!!!
अगदी तसंच ....
मला बऱ्याचदा तुझ्या मनातलं कळत नाही....
©®चित्रा पगारे


-


Fetching चित्रा पगारे Quotes