एक मुलगी म्हणून मला असं वाटतं,
आई बाबा ची काळजी या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे..
मोठं होत पर्यंत ते आपल्याला सगळं पुरवतात, आजारपणातही डॉक्टर असल्या सारखी काळजी घेतात, एखाद्या दिवस टिफीन नाही खाल्ला तर बघा आई कशी चिडते, आई जवळ असली की कोणत च मुल उपाशी राहत नाही , एक भाजी आवडली नाही तर दुसरी करून देते ती पण उपाशी नाही झोपू देत, त्यांचे हे ऋण फेडता न येण्यासारखे.
जसं जसं वय वाढत जात त्यांचं दुखणं ही सुरू होऊन जातं, लहानपणी त्यांनी आपली काळजी घेतली आता आपण आपली भूमिका बजवायला हवी.
त्यांच्या जेवणात प्रोटीन्स, फायबर चा समावेश करावा, रोज एक फळ द्यावं, जेवल्यावर लगेच पडू नये, आणखी बऱ्याच अशा छोट्या छोट्या गोष्टींचा त्यांच्या दैंनदिन जीवनात समावेश करावा. कामामध्ये कधी ते नाष्टा ही करत नसतात, कधी घाईगडबडीत जेवतात, तर गोळ्या औषधी व्यवस्थित घेत नाही ते त्यांच्या स्वस्थ्याबद्दल असं निष्काळजी वागतात पण आपण काळजी घ्यायला हवी माझ्या बहिणींना आणि मैत्रिणींना माझं एवढंच सांगणं..-
जग जिंकण्याची नाही पण मन जिंकण्याची इच्छा ठेवते..
मरत पर्यंत माणूस माझं माझं करत राहतो
घर माझं, संपत्ती माझी, सगळं माझंच,
आणि जातो तेव्हा शरीर सुद्धा इथे टाकून जातो मग वस्तूंवर कसला हक्क गाजवतो.
हा जन्म माणूस म्हणून मिळाला परत नाही मिळणार ते कर्मावर अवलंबून असतं, असं गीते मध्ये सांगतात..
मग मोक्ष मिळणार की किड्या मुंगीचा जन्म ते कर्म ठरवणार..
मानवाला सुखी जीवन मिळतं, त्याला बोलता येतं, हसता येतं, रडता येतं पण सगळ्यांना ते जगता मात्र येत नाही.
तो आपलं आयुष्य राग, द्वेष, भांडण, ईर्ष्या करण्यात घालवतो..
राग आला तर अपशब्द बोलून कोणाचं मन दुखवतो, आपल्या पेक्षा जास्त कोणाकडे काही दिसलं तर ईर्ष्या करतो, कधी संपत्ती साठी भांडतो, कधी लोभाने मोहून जातो..
विचार करण्यासारखे आहे,
काय संपूर्ण आयुष्य हेच सगळं करून वाया घालवायचं की एक चांगला व्यक्ती बनून समाजापुढे आदर्श ठेवायचा.
मिळालाच हा मानवाचा जन्म तर सार्थक झालं पाहिजे,
उद्या गेलो तर माणूस चांगला होता म्हणून लोकं हळहळले पाहिजे असो नको म्हणायला की बरच झालं गेला लवकर..
-

तसं तर भेटून
एक महिना ही झाला नाही
पण वर्षाआधीची मैत्री वाटतं..👭
तीन ऋतू सारखे वेगवेगळे आम्ही
पण विचार असतात आमचे जुळत..
एक moodie🤗,
एक foodie🍔
तर एक फुलपाखरासारखी
कधी इथे तर कधी तिथे क्षणात..🦋
विषय असो कुठलाही
चर्चा असतेच आमची छान रंगत..
सहा वाजायची वाट बघत बघत
कित्येक गप्पा होऊन जातात अनगिणत..
आठवतो तो पहिला दिवस
तेव्हाचा तो अनोळखीपणा आणि आता,
आता आहे आठवणी बनवत..-
हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळत नाही
पण मिळालेल्या गोष्टीत आनंद मात्र शोधता येतो..
-
शोधते आहे..
भर गर्दीमध्ये
स्वतःला शोधते आहे..
गजबजलेलं हे शहर
आणि मनाला मोहविनारे अनेक रस्ते..
नेमक जायचं कुठे या प्रश्नाचं उत्तर शोधते आहे..
तसे तर सगळे आपलेच वाटतात
पण जवळ जाताच दुरावा जाणवतो
मग मुखवटे घातलेल्या व्यक्तीत आपलं कोण ?
शोधते आहे..
मला काय हवं,
आई वडिलांना काय हवं
मनाची झालेली ही घालमेल कशी करायची दूर शोधते आहे..
सगळं निराशलेल वाटतं
नव्याने फुलवायच कसं ?
शोधते आहे..
भित्र्या मनाला धीर देत फक्त
वाट शोधते आहे..
-
बरंच अवघड
घरापासून दूर राहणं..
रक्ताचं जिवाभावाचं नातं
त्यांच्या आठवणीत मग दिवस काढणं..
जवळ असतांना थोडीफार कुजबुज चालतेच
आणि दूर गेले की त्यांच्याच आठवणीत डोळे पणवते..
भेटण्यासाठी त्यांना दिवस मोजावी वाटतं,
एक घट्ट मिठी मारून परत यावं वाटतं..
मोठ्यांची काळजी आणि लहनांचे लाड
यासाठी मन हुरहूरतं..
बघण्यासाठी ते चेहरे
मन कसं मग हे तळमळतं..
-
माझी आवडती बहीण
सगळ्यांना समजून घेते,
पण तिच्या मनात काय
ते तिच्यापर्यंत च ठेवते..
हिटलर.. हसणं तर कधी कधी
तिचं खूप महाग होऊन जाते,
आपल्या समाधानासाठी मग
छोटीशी smile देऊन देते..
कधी खूप बडबड तर
कधी एकदम च शांत,
समजून घेणं तिला कधी
मलाही नसते जमत..
दिसायला जशी गोड
मनानेही तेवढीच छान,
थोडी चिडखोर
पण आहे गुणवान..
-
खरंच कुणाच्या येण्याने
नकोस वाटणारं आयुष्य हव हवंस वाटू लागतं का ?
आयुष्याला त्रासलेले,
परत आयुष्य नव्याने जगावं वाटतं का ?
कुणाचे आधार देणारे शब्द,
काय जगायला शिकवू शकतात का ?
कुणी येऊन आपलं
विस्कटलेलं आयुष्य सावरू पाहतात,
का ते आपले खास होऊ शकतात का ?
आपण काही नसतांना
ते आपल्यावर जीव ओवाळून टाकतात
काय ते आयुष्याला एक वेगळं वळण देतात का ?-