आज खुप दिवस झाले
नाही मी रडलो
खुप दिवस झाले तुझ्या
आठवणीत नाही रमलो
दिस सरता सरेना माझा
तुझ्या गोड आठवणीत
नजरे आड होता तू माझ्या
कहूर उठती मनात
क्षण ते सारे
विस्कळून गेले
घालवलेले क्षण
पुन्हा आठवन करुन गेले
पुन्हा तुझ्या आठवणीत
रमून जावस वाटल
पुन्हा एकदा आठवन काढून
मला रडावस वाटल
नजरेत पाहता तुझ्या
खुप काही कळून चुकत
राहुन राहुन मन ते
तुझ्यातच गुन्तुन राहत.
धुंद धुंद रातिला
जनू चांदन्याची साथ
तशीच काहीशी तू
देशील का मला साथ ...- तो अनामिक
7 NOV 2018 AT 13:22