- हिरकणी
-
• Photographer by passion 📷
• Independent Filmmaker 🎬📽
• Freelancer writer✒ read more
विसकटलेल सावरण
हेच तर आयुष्य आहे
तू सोबत असली की
प्रत्येक क्षण खास आहे
✍️शब्दमृणाल-
पावसाची सर आज
आठवण तुझी घेऊन आली
हातात हात धरून दोघांचे चिंब भिजणे
अन् ओठावर हसु ठेऊन गेली-
दोघांमध्ये आहे आज
शत पावलांच अंतर...
मनामध्ये दोघांच्या एकमेकांच
प्रेम च आहे निरंतर...
✒शब्दमृणाल
-
सोडायचा होता मला
गुंता आपल्या प्रेमाचा...
तू समोर आली अजुनच
गुरफटत गेला धागा मनाचा...
✒शब्दमृणाल
-
अबोल प्रेमाची भाषा
तुला का नाही कळत...
तुझी प्रेमाची नजर
माझ्याकडे का नाही वळत...
✒शब्दमृणाल-
चंद्र आहे साक्षीला
तुझ्या गोड स्वप्नाच्या...
मिटून घेतल्या पापण्या
साठवुन आठवणी प्रेमाच्या...
✒ शब्दमृणाल-
तू परतून येणार नाहीस माहित आहे
तरी देखील मन तुझी वाट बघत...
मनापासुन खर प्रेम केलय त्याने
म्हणूनच कदाचित त्याला ते जमत...
✒ शब्दमृणाल-
ठरल होत आपल
स्वप्नात चोरुन भेटायच...
भेटितल्या त्या क्षणाना
गोड आठवणीत साठवायच..
✒शब्दमृणाल
-