प्रिय सोहम,
आज तुझा वाढदिवस असल्यामुळे आमच्या मनात अपार आनंद आणि अभिमान आहे... लहानपणापासून तू आमच्या घरात प्रेमाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण करत आलास.. तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामुळे प्रत्येक दिवसाला नवीन ऊर्जा मिळते आणि तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे आम्हाला सदैव आनंद मिळतो. या विशेष दिवशी तुला उत्तम आरोग्य, अपार यश आणि अनमोल सुखाच्या हार्दिक शुभेच्छा देताना मनभरून प्रेम आणि आशीर्वाद उमटतात....
वाढदिवसाच्या या आनंददायी दिवशी तुझ्या उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक प्रार्थना करते. देव तुला अनंत आनंद, दीर्घायुष्य आणि सकारात्मक ऊर्जा देवो. तुझ्या मेहनतीला गोड यश लाभो आणि तुझ्या प्रत्येक स्वप्नांची पूर्तता होवो, हीच आमची देवापुढील प्रार्थना आहे. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तू उत्साहाने पुढे चालत राहशील आणि प्रत्येक दिवस तुला नवनवीन सुख घेऊन येवो, अशी माझी मनापासून शुभेच्छा आणि आशीर्वाद आहेत...
- भूषण खैरनार-
अनुरूप असे स्थळ सुचित करण्यात आले नको नाही म्हणता दादानी वहीनीला येऊनही पाहिलं
पाहता क्षणी विचार चक्र सुरु झाले विचारांच वादळ थांबेपर्यंत सगळ कसं पुढ्यात उभ राहिले
अनोळखी हे चेहरे ओळखीचे झाले बोलता बोलता दोघे मैत्रीत विणले गेले
पाहता पाहता लग्नसराई आली सात वचनाच्या मुहूर्ताची वेळ झाली
छान असे मंगलकार्य घडले आणि दोघांचेही... पाऊल संसारात पडले
जीवनाच्या या नाजूक वळणावरती झाल्या त्या भेटीगाठी.. सहवासातील गोड कडू आठवणी घेऊन.. समजलच नाही... कधी २३ कॅलेंडर पलटली..
आला दादा व वहीनींचा अनमोल अतुट क्षणांचा आठवणींचा हा दिवस... तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा....
- भूषण खैरनार-
Happy Birthday Captain
होळीचा रंग वहिनी..!!
मैत्रीची चाहूल वहिनी..!!
प्रेमाचे बोल वहिनी..!!
रस्त्यातील वाट वहिनी..!!
मायेची सावली वहिनी..!!
कौतुकाची थाप वहिनी..!!
आईची कमी
पूर्ण करणारी वहिनी..!!
आमच्या घराची शान वहिनी..!!
ह्रदयातील आवाज वहिनी..!!
अश्या आमच्या गोड वहिनी..!!
तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
हिच साईचरणी प्रार्थना.....!
- भूषण खैरनार-
साईभंडा- यात
जडलाय तुझ्या रूपाचा ध्यास,
पूर्ण कर भक्ताची आस,
आशिर्वादासह घेतोय निरोप,
पुढच्या वर्षी करीन आणखी
सुंदर आरास.......
ओम साईराम.......!
- खैरनार परिवार
-
तू आहे....
तुला माहित आहे का ?? माझ्या साथीला...
जाणा-या वर्षात तू आहे...येणा-या वर्षात तू आहे...
माझ्यात मी सोडून...माझ्यात तू आहे...
Love u Bhaijaan
-
तुमच्या नव्या आयुष्याचा हा प्रवास आजपासून सुरू झाला,आणि तो असाच अप्रतिमरित्या चालत राहो......हिच माझी साईचरणी प्रार्थना व
पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा.....!
- भूषण खैरनार-
"भाऊ" आपल्या तत्वांशी
एकनिष्ठ होतात तुम्ही,
अथक प्रयत्नांनी
माणसं घडवली तुम्ही,
सर्वांच्या ह्रदयावर राज्य
केले तुम्ही,माणुसकीचा
आधारस्तंभ होतात तुम्ही
म्हणूनच देवाला सुद्धा
आवडलात तुम्ही....
# मिस यू भाऊ
- भूषण खैरनार-
आमच्या सर्वांचे मार्गदर्शक,
कुशल नैत्रृत्व,शिस्त प्रिय....
तसेच आमचे मित्र,एक
दिलदार व्यक्तिमत्व
असे आमचे
साईपाईप प्लॅन्ट चे सुपर
वाईजर माननीय श्री.दत्तात्रय
वाघ साहेब यांना ३६ व्या
वाढदिवसाच्या 🎂 खुप खुप
शुभेच्छा.....तुम्हाला उदंड
आयुष्य लाभो हिच साईचरणी
प्रार्थना करतो.....
- भूषण खैरनार-
खाली दामन भी भर देते है
हर उम्मीद पूरी कर देते है,
जब देने पर आते है तो
"मेरे साई"
लिखी तकदीर भी
बदल देते है.......!
सुप्रभात
ओम साईराम
# साईभंडारा उत्सव २०२४
-
आपणास फक्त धन्यवाद असे
म्हणुन चालणार नाही आशिर्वाद
देणारे, कौतुक करणारे,पुढे
जाण्याची प्रेरणा देणारे
आपल्यासारखे मनानं आणि मनानं
माझ्यापेक्षाही मोठे असणारे
मार्गदर्शक,हितचिंतक,मित्रपरिवार,
सहकारी सोबत असणे म्हणजे
अपेक्षेच्या पलीकडे जाऊन
काहीतरी मिळवलयं याचं समाधान
शब्दात सांगता येणार नाही....!
आपण माझ्या वाढदिवसानिमित्त
दिलेल्या प्रचंड प्रेमाबद्दल
खुप खुप धन्यवाद.....!
- भूषण खैरनार
-