लग्न
माहेरच्या अंगणात भातुकलीचा खेळ
मांडता मांडता अनोळखी व्यक्तीशी
संसार करायला तयार असणारी म्हणजे "ती"
अंतरपाटाच्या एका बाजूला उभे असताना
वाढत्या ठोक्यांचे व मनातील प्रश्नांचे
उत्तर म्हणजे "तो"
सप्तपदीच्या पाऊली प्रमाणे
सावलीसारखी साथ देणारी म्हणजे "ती"
उंबरठ्यावरचे माप ओलांडताना
खंबीरपणे सदैव मागे उभा असणारा "तो"
त्याच्या आवडीनिवडी आता
आपल्या आवडीनिवडी माननारी "ती"
न सांगताही तिच्या मनातलं
सगळं काही समजून जाणारा म्हणजे "तो"
- VB❤
-