Ashwini Patekar   (लाडकी)
13 Followers · 20 Following

Joined 6 October 2021


Joined 6 October 2021
30 APR AT 15:48

तुझ्या काळजाची
धडधड मला व्हायचंय
तुझ्या ओठाचं
स्मित मला व्हायचंय
तुझ्या श्वासाचा
गंध मला व्हायचंय
सुखात तुझ्या मला
माझं सुख वेचायचंय
दुःख आलेचं कधी तर
वाटून मला घ्यायचंय
जीवापाड प्रेम मला
फक्त तुझ्यावर करायचंय
सख्या तूझ्या जीवनाचा
भाग मला व्हायचंय....

-


30 APR AT 15:33

अव्यक्त मुक्या भावनांना
व्यक्त करण्याची वेळ आली
शब्दांना पंख फुटले अन,
भावना रिती झाली...
दाबल्या होत्या कुठेतरी
काळजात तुझ्याचं आठवणी
काय अन कस सांगू
प्रीत शब्दांची साठवणी
कोमल तुझ्या पावलांची
चाहूल लागे मनाला
हळुवार गुंफत स्वप्नांची
माळ रंगली क्षणाला...
स्वप्नं डोळ्यातलं खरं केलंस
तुझ्यासोबत पाहिलेलं
अलवार साथीनं सखे
माझ्या साठी वाहिलेलं...
त्या क्षणाला वाटलं बांधून ठेवावं
आठवाच्या मिठीत जखडून ठेवावं
कैद करून कायमचं
तुलाही माझ्यातचं साठवावं....


-


25 APR AT 17:46

मनातल्या उन्हात
एक वादळ भिरभिरत
समज गैरसमज
चक्रव्युहात अडकवत...

-


25 APR AT 8:51

मनातल्या वादळाला
सीमा कधीचं नसते
शांत होऊन स्वार त्यावर
आपण राज्य करायचे असते...

-


25 APR AT 8:41

मनातलं वादळ भयानक असतं
अख्या धडाला कोलमडून जायला होतं
सावरायला तेव्हा मनचं खंबीर असतं
जेव्हा किनाऱ्यावर आपलं कोणी दिसतं...

-


9 APR AT 9:05

एक कोमल कळी, पडली वासनेला बळी
ती नाजूक तार होती, जीवनाचा आनंद घेतं होती
दुष्ट नजर लागली अन, फसवू लागली सगळी
विश्वास डोळे झाकून तीने, समाजावर ठेवला होता
त्याचं समाज कंटकांनी, गळा तिचा घोटला होता
थांबलेला पाहुन तिचा श्वास, वाढत गेला त्यांचा ध्यास
एक दोन तीन नव्हे, कैक कळ्या अशाच खुडल्या
धाय मोकलून तेव्हा, बाया बापड्याही रडल्या
हिचं वेळ योग्य होती, कळीला मजबूत करण्याची
नजर भेदता यायला हवी, साऱ्या दुष्ट नियतीची
गरज आहे समाजात, मुलींना शिक्षण देण्याची
अन असावी जोड त्याला, स्व संरक्षण प्रशिक्षणाची
तेव्हाचं होईल बदल जेव्हा, मुली खंबीर होतील
नव्या पिढीची नव्या दिशेची, सुरुवात नक्की होईल...



-


8 APR AT 8:10

तुझ्याशिवाय आयुष्य, एकटी जगू शकेल का... संकटे सारी, पार करू शकेल का...
जाऊ नकोस राया, सोडून माझा हात... जीवनाच्या वाटेवर, करू नकोस घात....
माझं जग तुझ्याविना, कायमचं अपूर्ण... असशील माझ्या सोबत, होईल तेव्हा पूर्ण...
आनंदी असेल तु तर,मी ही आनंदात जगेल
तुझ्यासवे जीवनात, मनापासून रमेल....
मायेन जपून घेईन, कोमल नातं मनाचं
स्वप्न गोड गुलाबी, तुझ्या माझ्या प्रेमाचं...
तूझ्या कवेत राग रुसवा, क्षणात विसरून जाईल
जन्मभर सख्या तुला, निखळ प्रेम देईल...


-


27 MAR AT 20:40

Those who have a beautiful laugh have deep wounds.

-


26 MAR AT 22:30

बेड्याचं जीवनाच्या एक सुप्त तो आधार
पाट अश्रूचे वाहिले किती बस जाणतो पदर
मुक्त व्हावं वाटतं कधी स्वैर होऊन उडावं
एक घेऊन उंच झोका स्वप्नामध्ये रमावं...

-


26 MAR AT 19:45

गुलाल का रंग बस
हाथो पे छा गया

इक इश्क का रंग हैं
जो दिल का ताज बन गया...

-


Fetching Ashwini Patekar Quotes