एक नवी सुरुवात नव्या स्वप्नांची
जिद्दीने त्यासाठी क्षणोक्षण लढण्याची
एक नवी सुरुवात नवीन वाटा शोधण्याची
अंधारलेल्या क्षणांतून पुन्हा उमेदीने उभारण्याची
एक नवी सुरुवात आसमंत उजळवण्याची
चरांचरांत प्रकाश तेजोमय करण्यासाठी
एक नवी सुरुवात हरवलेले क्षण पुन्हा जगण्याची
आनंदाच्या डोहात यशोशिखरे सर करण्याची
- अश्विनी मोहिते- काव्यामृत
1 OCT 2018 AT 11:06