Ashwini Bramhanathkar   (अश्विनी अभिजीत)
37 Followers · 3 Following

Joined 7 September 2018


Joined 7 September 2018
25 APR 2022 AT 15:10

वसंताची चाहुल गौरीचे डोहाळे
कोकीळीचा स्वर अन् निसर्गाचे सोहळे...
आंब्याची डाळ कैरीचे पन्हे
सख्यांनो आज हळदीकुंकवाला येणे...

सौ. मुग्धा बोरगावकर,
फ्लॅट नंबर ३०२, वेळ ६:३०

-


23 NOV 2021 AT 22:01

हवेत विरूनी जावे
अत्तर विरते जसे
की मातीत मिसळावे
फुल मिसळते तसे....
देऊनी गंध मनाचा
अवघे जीवन फुलवावे
की पारिजात होऊनी मी
तुझ्या ओंजळीत विसावावे...
हलकेच सांभाळ मला
कोमेजते रे मन माझे
तु असता जवळी माझ्या
ना उरते कशाचे ओझे...
- अश्विनी अभिजित



-


3 JUL 2021 AT 10:29

श्वास गुदमरतो इथे
होतो जीव तगमग...
दिस सरता सरता
जगण्याची लगबग...
हातावर पोट अन्
पोटचे पोर हातावर
डांबुन राहिली माणसे
फिरे मोकाट जनावरं...
रिता खिसा आता
फाटकीच झोळी
स्मशानाच्या दारातही
रांगा लागती अवेळी...
अश्विनी अभिजित

-


1 JUL 2021 AT 0:10

तुझं माझं करता करता
सारं काही आपलं होतं,
छोट्या छोट्या आनंदाने
घर व्यापलं जातं....
तुझी माझी माणसं मग
आपली वाटायला लागतात,
एकमेकांच्या सुखासाठी
सारेच झटायला लागतात....
कामंही जातात विभागली
तु-मी करत करत,
सुरू होतो संसार दोघांचा
एकमेकांच्या कलाकलाने घेत....
मला माझी space हवी
हवं आहे स्वातंत्र्य,
म्हणताना आवडु लागतं
दोघांनाही हे पारतंत्र्य....
एकमेकांशिवाय आता
मुलीच करमत नाही,
तिचं माहेरी जाणंही आता
त्याला आवडत नाही...
कधी कधी मात्र
कुठेतरी बिनसतं,
दोघांपैकी कुणीही मग
ऐकण्यात नसतं....
सुरू होताच भांडण
लटका राग नाकावर,
चुक ज्याला मान्य तो म्हणतो
Sorry , माफ कर....
यालाच म्हणतात संसार
अन् हेच जन्मोजन्मीचं नातं,
तुझं - माझं करता करता
सारंच आपलंस होतं....
अश्विनी अभिजीत

-


29 MAR 2021 AT 9:40

अल्लड अवखळ रंग सांडले
पळस फुलांचा पसारा
कधी गुलाल पडला वाटेवरती
खेळ रंगांचा हा सारा....
अवचित येतो कुणी गिरीधर
कुणी होते तेव्हा राधा
कधी अनामिक ओढ अशी
अन् होते प्रेम बाधा....

-


28 MAR 2021 AT 18:57

अल्लड अवखळ रंग सांडले
पळस फुलांचा पसारा
कधी गुलाल पडला वाटेवरती
खेळ रंगांचा हा सारा....
अवचित येतो कुणी गिरीधर
कुणी होते तेव्हा राधा
कधी अनामिक ओढ अशी
अन् होते प्रेम बाधा....

-


14 MAR 2021 AT 22:08

अलक -

तशी ती एक शिक्षीका, पण करोनामुळे शाळा बंद म्हणुन ती घरीच असते सध्या, तर आवड म्हणुन स्वयंपाक करतानाचे व्हिडिओ बनवुन तिने सोशल मिडीयावर टाकायला सुरुवात केली... आणि अगदी लाखांच्या वर तिचे सबस्क्राईबर झाले... टाईमपास म्हणुन व्हिडिओ केले तर आता त्यातुन पैसेही मिळायला लागले....
पण लाँकडाऊन मुळे बाहेरचं जेवण मागवणारे त्यातल्या त्यात रस्त्यालगत असलेल्या गाड्यावरचं अन्न तर कुणी पाहायलाही तयार नाही हो... पण तरीही रोज अगदी चविष्ट असे जेवण बनवुन दोघेही आजी आजोबा ग्राहकांची वाट पाहात बसतात... दिवसभर वाट पाहुन सत्तर ऐंशी रूपये पण मिळत नाहीत असं सांगुन डोळ्यात पाणी आणतात...
खरंच इतका विरोधी परिणाम असतो का एकाच परिस्थिती चा दोन भिन्न जीवांवर...
‌.

-


27 JUN 2020 AT 0:15

काय सांगु तुला माझ्या नशीबाचं कौतुक,
सोन्यासारखा सखा आणि रुप्यासारखी लेक...

घर भरलं गोकुळ माझं येतं जातं गणगोतं,
कष्टाची मीठभाकरी करी आल्यागेल्याचं स्वागत...

मायमाऊली सासु माझी सासरा गं बाप जसा,
लहानगा दीर बाई भाऊ जसा पाठीराखा...

सारं असचं राहु दे सुखाचा कर संसार,
आई बापाला मिळु दे माझ्या सौभाग्याची खबर...

सासरची माणसं जणु दुसरं माहेर,
खरं सांगते तुला माझं गुपीत हे सारं.....

अश्विनी अभिजित

-


27 JUN 2020 AT 0:09

काय सांगु तुला माझ्या नशीबाचं कौतुक,
सोन्यासारखा सखा आणि रुप्यासारखी लेक...

घर भरलं गोकुळ माझं येतं जातं गणगोतं,
कष्टाची मीठभाकरी करी आल्यागेल्याचं स्वागत...

मायमाऊली सासु माझी सासरा गं बाप जसा,
लहानगा दीर बाई भाऊ जसा पाठीराखा...

सारं असचं राहु दे सुखाचा कर संसार,
आई बापाला मिळु दे माझ्या सौभाग्याची खबर...

सासरची माणसं जणु दुसरं माहेर,
खरं सांगते तुला माझं गुपीत हे सारं.....

-


21 JUN 2020 AT 15:41



बाप लेकीची माया
तिथे दुनीयाच वेगळी
लेकीसाठी भले माय
जरी नांदते सासरी....
क्षण एक अन् दुरावा असा
आटले का मायेचे झरे
माहेरच्या ओसरीत जाता
पाऊल उंबऱ्यात आडे...
मन पाखराची माया
दडे आभाळात गुपीत
बाबा तुमच्या जाण्यानं
झालं गोकुळ शापीत...
बाप रूसला रूसला
काळ कुरूप निघाला
आईच्या पदराआड
चांदणे ठेऊनीया गेला...
सावित्रीच माय माझी
सत्यवान बाप होता,
दृष्टावलं गोकुळ की
यमदुताचा शाप होता...
अश्विनी अभिजीत

-


Fetching Ashwini Bramhanathkar Quotes