मनाचे टॉनिक-
-------------------------
कार्य-प्रसंगांच्या निमित्ताने अनेकांच्या भेटी होतात,
काही नियमित भेटणारे , अधून-मधून-भेटणारे , तर काही जण
खूप वर्ष नंतर भेटतात .
अशा भेटीत मग खुप जुन्या आठवणी निघतात आपल्या आठवणीतल्या माणसांच्या
आणि विस्मृतीत गेलेल्या माणसांच्या आठवणी निघतात,
सुखाचे क्षण ,आनंद देणारे क्षण, दुखांचे प्रसंग सांगुन मन
हलके केल्याचे समाधान मिळते..
आपल्या माणसांचा हा असा सहवास "मनाला नवा तजेला देणारा असतो",
त्या साठी आपण माणसांच्या सहवासात रमण्यास शिकले पाहिजे. मरगळलेल्या मनाला पुन्हा टवटवीत ठेवु शकणारे स्नेह-टॉनिक आपण देऊ शकुत.
नववर्षात आपल्या मना साठी हा आरोग्यदायी हमखास ऊपाय करूया.
मित्रांनो-
शुभ-दिन शुभेच्छा.
अरुण वि.देशपांडे -पुणे.
9850177342- Arun V Deshpande
4 JAN 2019 AT 8:36