Arti Bade   (Arti Bade..)
57 Followers · 33 Following

I'm not poet,bt poetry is my passion..
Joined 7 September 2017


I'm not poet,bt poetry is my passion..
Joined 7 September 2017
28 MAR 2022 AT 17:15

बोलणारी सहज बोलून जातात की खूप मनावर घेतेस, उगीचच त्रास करून घेतेस,
पण त्यांना काय माहित की जीव लावणारी माणसं अचानक बदलतात तेव्हा किती आणि कसा त्रास होतो..

-


3 JAN 2022 AT 21:53

'मला वाईट वाटले की ती मला समजावते,आणि समजूनही घेते,
'जेव्हा मी चुकते तेव्हा ती मला हे चुकतंय अस सांगते,
'जेव्हा मी एकटी पडते तेव्हा साथ मला ती देते,
'जेव्हा कुणीच नसतं आजूबाजूला माझ्या तेव्हा ती मात्र असते,
'खूप पक्की मैत्रीण आहे ती माझी,मला पुर्ण ओळखते,
पण आहे तरी कोण ती?
ती आहे "माझ्यातली मी"

Poem queen arti

-


3 JAN 2022 AT 18:19

"घराचं अंगण साफ ठेवण्यापेक्षा,
मनाचं अंगण साफ ठेवण जास्त महत्वाचं."

Poem_queen_arti

-


1 JAN 2022 AT 22:17

खरंच किती गंमत वाटते ना तेव्हा,जेव्हा आपल्याला कळतं असत की समोरचा कसा वागतोय,आणि तरीही आपण कळत नसल्याचं वेड घेतो, आणि समोरच्यालाही वाटत की याला काहीच कळत नाहीय..

-


1 JAN 2022 AT 19:30

साल तो हर साल बदलता है,
लेकीन यहाँ लोक किसी भी वक्त बदलते है,
काश लोगों का बदलने का भी कोई मौसम होता,
तो फिर मौसम पास आनेपर हम अपने मन को पहले से ही समझाकर तैयार करते,
ओर फिर दु:ख भी नहीं होता,और तकलीफ भी कम होती!

-


1 JAN 2022 AT 19:13

अच्छा देखने की आदत हो तो सब अच्छा ही दिखता है,
लेकीन बुराई निकालाने का शौक हो तो अच्छी चीजों में भी बुराई ही दिखती है,
ये जमाना बडा़ बेईमान है साहब,
यहाँ झुठ ही जादा चलता है!

Arti Avhad

-


16 NOV 2021 AT 7:55

माहेरची वाट आहे माझी खूप लांब,
पण तिथे एकदा गेल्यावर मन सारखं म्हणत राहतं अजून थोडं थांब,
आईच्या मायेची ऊब अन् बाबांच्या प्रेमाची सावली हवीहवीशी वाटते,
माहेर म्हणजे काय असतं हे प्रत्येक लेकीला सासरी गेल्यावरचं कळते,
हळवं होत मन जेव्हा आईच्या मायेची ऊब दुरावते,
जितक्या जास्त दिवसांनी भेटो तिची मायेची ऊब अजूनच वाढत जाते,
वळण लावताना असणारा बाबांचा धाक अचानक हळवा होऊन जातो,
नारळाप्रमाणे बाहेरून टणक पण आतून मात्र एकदम मऊ ही जाणीव बाप करून देतो,
आनंदाचं झाड हे असंच आनंद देत असतं,
म्हणून प्रत्येक लेकीच मन इथे खूप रमतं..
म्हणून प्रत्येक लेकीच मन इथे खूप रमतं..

Arti Avhad

-


11 APR 2021 AT 22:54

ती आई होती जी एवढीशी जरी जखम झाली तरी लगेच काहीतरी औषध लावायची,
जखमेत पाणी होईल म्हणून चार दिवस पाण्यात हात घालू न द्यायची,
ती आई होती,जी मी उदास असल्यावर चार वेळा काय झालं गं विचारायची,
ती आई होती जी मी रडल्यावर स्वतःही रडायची,
ती आई होती जी मी आजारी असल्यावर रात्र रात्र जागायची,
ती आई होती जी मला आवडणारा पदार्थ स्वतःन खाता मला खायला द्यायची,
खरंच ती आई होती जी माझ्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करायची,
का आई आणि मुलीला देव ऐकमेकींपासून दूर करतो,
आई भेटायचेय गं तुला लवकर,
निजायचेय तुझ्या कुशीत मनभर,
तु मायेने बनवलेले पदार्थ खायचेत मला मनसोक्त,
तुझ्या कुशीत निजायचेय मला निर्धास्त..
तुझ्या कुशीत निजायचेय मला निर्धास्त.....


-


15 JUN 2020 AT 21:25

दुखःआले थोडे म्हणून खचून जायचं नसतं,
आज जरी आपली नसली तरी उद्या आपली असणारं या आशेवर जगायचं असतं,
दुखःभोगल्याशिवय सुख उपभोगण्यातला आनंद अनुभवता येत नाही,
छानसा हा जन्म नशिबाशिवाय मिळत नाही,
उगाच का धिक्कार करायचा या छानश्या जीवाचा,
गमावून एकदा बसल्यावर पुन्हा नाही मिळायचा,
गुदमरले जरी मन कधी तर रडायचं,पडायचं,
पण आयुष्याशी नाही हरायच,
सुंदरसा हा जन्म दिलाय,
त्याला असं नाही संपवायचं,
कोण आहे इथे असं ज्याच्या आयुष्यात अडचणी नाहीत,
पण सर्वच असा टोकाचा निर्णय घेत नाहीत,
घेतो कधी कधी परमेश्वर खूप परीक्षा,
पण त्यालाही बघायचं असतं कोण लढून प्रत्येक संकटाशी करतोय जीवाची रक्षा,
कितीही काही भेटलं आयुष्यात प्रत्येकाला तरी काही ना काहीतरी कमीच पडत,
आहे जेवढं नशिबात तेवढंच पदरात आपल्या पडत....
आहे जेवढं नशिबात तेवढंच पदरात आपल्या पडत......


आरती....♥️

-


18 APR 2020 AT 23:14

दुरिया अगर बढ़ गई तो क्या हुआ,
प्यार तो कम नहीं होगा,
कहते है सब्र का फल मीठा होता है,
तो जरूर कुछ अच्छा लिखा होगा।

-


Fetching Arti Bade Quotes