Arpana Meshram   (Arpana Meshram)
23 Followers · 13 Following

मनातले भाव मांडतांना...
Part time writer
Nagpur, Maharashtra
Joined 13 January 2018


मनातले भाव मांडतांना...
Part time writer
Nagpur, Maharashtra
Joined 13 January 2018
8 APR 2019 AT 12:50

वो जिसे हम पसंत करते हैं,
वो तो किसी और पे ही मरते है।।

-


8 APR 2019 AT 1:45

या एकाच ठिकाणी
नेहमी भरकटते मी।
भावनांच्या वादळात
का अडते मी।।
तू येतोस आणि निघून जातोस
तुला काहीच फरक पडत नाही।
परंतु माझ्या मनातील हाल
मी तुला का सांगू शकत नाही।।
तुझं जवळ असणं
जणू फार गोड आहे।
पण तुझं दूर जाणं
माझ्याकरिता असहनीय आहे।।
माहीती आहे तू नाही
नेहमीसाठी इथे।
पण या विचाराने
होते मन वेडे पिसे।।

-


8 NOV 2018 AT 23:41

नकारात पण नाही, अन् होकारात पण नाही
प्रिती चे हे बोल, काय काय करवते
काही कळत पण नाही....
स्पष्ट पण नाही, अन् शुद्ध पण नाही
एेकणार्याला ही कळणार
अशी स्पष्ट वाणी ही नाही...
भेट ही नाही, मतभेदही नाही
जणू उपकाराची, पहल ही नाही....
नाते हे असे, कसे का जन्मले
नाही उमर या नात्याची, असे कसे वाढले...
नको त्याला नाही म्हनावे, का म्हणून अडकून ठेवावे
स्पष्टशुद्ध बोलीने, हे प्रत्यक्षात सोडवावे....


-


16 SEP 2018 AT 9:09

जिंदगी की उलझनो को हमने
इस कदर सुलझाया की,
अब उनकी बातों का असर
बस खयालों तक सीमित रहा....

-


3 SEP 2018 AT 23:03

स्वप्नपुर्तीची काहीच चाहूल नाही,
पण एक विश्वास आहे...
या विश्वासाची डोर नाजूक जरी असली,
तरी मजबूत आहे...
तुझ्या या स्वप्नपुर्तीची चाहूल तुला लवकरच लागेल,
कारण
विश्वासासारखी गोष्ट हरण्यासाठी नव्हे तर,
हरता हरता जिंकण्यासाठी आहे...

-


28 AUG 2018 AT 20:52

Its my emotions😊😊

-


27 AUG 2018 AT 9:09

सत्य...
बघायला गेलं तर फक्त दोन शब्द आहेत.. पण समजायला लागलं तर जगातील मोठ्यात मोठी गोष्ट लहान ठरेल...सत्य... सांगायला फार धाडस लागतं... सत्य... ऐकायला मोठ्ठ काळीज लागतं... सत्य... फार कडू आहे... सगळ्यानांच झेपावणार असं कठीण आहे..

-


24 AUG 2018 AT 22:48

तुझी...
या रिमझिमत्या सरींसोबत बेधुंद बागडणार्या तुझ्या बालिश स्वभावाची...
पाण्याच्या डबक्यांवर बेधुंद खेळणार्या या चंचल स्वभावाची...
छत्री हाती असतांनाही पावसाच्या सरीत भिजणार्या तुझ्या या अल्लड स्वभावाची...

-


24 AUG 2018 AT 21:38

Meaning of Samir....
S - Sensitive
A - Amazing
M - Madly lv with words
I - Idealistic
R - Radiant

-


24 AUG 2018 AT 1:02

धागे
या वळणावरचे धागे
अडीअडचणीत टाकणारे
अन् सरळ मार्गात
गुंतवून सोडणारे....
धागे
या वळणावरचे धागे
सूसाट पळणारे
मनाच्या अरूंद पोकळीत
साठवून ठेवणारे...
धागे
यी वळणावरचे धागे
नुसत्या परिकल्पनेत रमणारे
नको तेव्हा, नको तिथे
समोरे येणारे....
धागे
या वळणावरचे धागे
अस्सल माणूसकी शिकवणारे
जगावे कसो अन् राहावे कसे
समजावून सांगणारे....
धागे
या वळणावरचे धागे
ओंजळीत येतास दम तोडणारे
पण मोकळे सोडल्यास
अनंत फुलणारे...
धागे
या वळणावरचे धागे
स्वतःची प्रतिमा घडवणारे
दूरद्रुष्टीची चाहूल कळवणारे
असे हे धागे
या वळणावरचे धागे....

-


Fetching Arpana Meshram Quotes