माझी आई❣️
आई : मायेचा सागर, जीवनाचा आधार
अशा कित्येक उपमा तिला दिलेल्या,
पण या उपमा पुरेश्या आहेत का
तिच्याबद्दल मनातील भावना व्यक्त करायला?
कोण ती? काय तिचं अस्तित्व ?
मुलांवर प्रेम करणे हेच तिच्या जीवनातील तत्त्व,
कशी हाक मारायची?
आई...मम्मी... की... माँ... अम्मी ?
कशीही हाक मारा पण उत्तर मात्र एका गोड हसूनेच मिळेल !
घाव आपल्याला झाला तरी तिला दुखतं
प्रत्येक दिवशी तिचं मन आपल्या आनंदासाठी झुरतं
या सर्वांऐवजी ती Return Gift काय मागते?
प्रेमाचे दोन बोल आणि एक मिठी तिला चालते 😊
- अपूर्वा शेळके 🌸
-