अंकिता तायडे   (अंकिता तायडे🖋️)
95 Followers · 4 Following

🌼Writer_by_Passion📝.
Joined 23 March 2020


🌼Writer_by_Passion📝.
Joined 23 March 2020

(आजी)
आ- आपल्या आयुष्यातील सर्वात प्रेमळ
जी-जीवापाड व निस्वार्थ प्रेम देणारी व्यक्ती।।— % &

-



Rose Day मराठीत याला गुलाब दिवस म्हणतात, आमचा Rose Day थोडा वेगळ्या पदधतीने आम्ही साजरा केला होता, मी माझ्या लाडक्या मैत्रीणीला एक गुलाब देऊन हा दिवस साजरा केला होता.
......तो गुलाब माझ्या हातातून मी तिला दिला तेव्हा ती मात्र अतिशय भाऊक झाली होती, खर सांगायचं तर भाऊकचं होती ती. छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद शोधणारी ती होती. -होस्टेलमध्ये असताना आम्ही Rose Day सोबत chocolate Day सुदधा साजरा केला होता. हि गोष्ट घडून सुमारे २ वर्ष झाले असावे, दिवस मागे गेलेत परंतु आज Rose Day च्या निमित्ताने का होईना आठवणी पुन्हा एकदा ताज्या झाल्या व मनही भाउक झालं.

-अंकिता तायडे

-



शेतात गेल्यानंतर,
निरभ्र आकाश व
हिरवळ असते जणू
आपल्या साथीला।
परी मंत्रमुग्ध करणारा
सुवास असतो तेथील मातीला।।

-अंकिता तायडे

-



आई जेव्हा घरी नसते....

आई जेव्हा घरी नसते....
देवळातले सर्व देव दिसते,
आईचं आहे घरातील खरा देव,
हे त्यावेळी आपल्याला कळून चुकते ।

आई घरी असतांना मुलांना
घरकामाचे टेन्शन नसते,
ती घरी नसतांना मात्र आम्हा
मुलांची तारांबळ उडते.

आई घरी नसते तेव्हा...
स्वयंपाकात आमच्या कमी असते,
आईने बनवलेल्या जेवणात मात्र
कायमचं अन्नपूर्णा वसते।

घरात असते आई तेव्हा,
प्रत्येकाच्या मुखवट्यावर हास्य असते...
परंतू घरात नसते आई जेव्हा .... क्षणोक्षणी तिची आठवण येते.

जेव्हा आई घरी नसते,
गाभाऱ्यातील देवही उपाशी असते....
ती घरी परतल्यावर मात्र सर्वांचे लाड ती पुरवते.... ती येताच घराचे स्वर्गात रूपांतर होते।।

-अंकिता_तायडे

-



वाद होतो रोज, तरीही बोलल्याशिवाय राहवेना।
आपलं सोबत राहणं, सख्यांना काही आवडेना,
मी असते रागात तेव्हा,
तुला माझे रौद्ररूप काही पाहवेना;😅
न समजणाऱ्या या मैत्रीला काय द्यावे,
नाव हे काही दोघींना ही जमेना।।।

-



Stay on top!
Stay on grounded!

-



काही लोक गोष्टी फक्त ऐकतात समजुन घेत नाहीत, तर त्यांनी समजुन घायला हवं की देवाने कान गोष्टी ऐकण्यासाठी दिले व बुद्धी ऐकलेली गोष्ट समजुन घेण्यासाठी।

-



आपण स्वतःला पूर्णपणे ओळ्खल्यांनातर, आपल्याला प्रत्येक व्यक्तीत आपण दृष्टीस पडतो।

-



First love

-



कामाची सुरुवात.

-


Fetching अंकिता तायडे Quotes