तो बाप असतो
बाळंतपण झाल्यावर त्याचाही नवीन जन्म होतो
धावपळ करतो ,औषध घेतो, पैशांची जुळवाजुळव करतो
बाळाला पहिल्यांदा कुशीत घेतल्यावर आनंदाने न्ह्याहून निघतो
.... तो बाप असतो
पडेल ती घरातली सर्व कामे करतो
काबाडकष्ट करून घरी आला की बाळाचा हसरा चेहरा पाहून सुखावतो
बाळ जर रडत असेल तर रात्रभर कुशीत घेऊन बसतो
... तो बाप असतो
सतत मुलांच्या आनंदासाठी धडपडत असतो
मुलांच्या वाजवी खर्चासाठी रक्ताच पाणी करतो
स्वतःच्या आवडीनिवडी, दुःख बाजूला सारून मुलांची हौसमौज करतो
... तो बाप असतो
आयुष्याचे खडतर धडे शिकवीत मार्ग दाखवतो
कितीही मोठं संकट आलं तरी धीराने सावली सारखा आपल्या पाठीशी असतो
ज्याच्या फक्त असण्यानेच जगणे सोपे होऊन जाते
... तो बाप असतो
मुलगी सासरी जाताना धायमोकळून रडतो
माझ्या काळजाच्या तुकड्याला नीट जपा अस हात जोडून सांगतो
तिच्या लग्नात मोठ्या दिमाखाने खर्च करतो
... तो बाप असतो
मायेचं वात्सल्य , दयेचा सागर तो असतो
वेळप्रसंगी कठोर पण भरभरून प्रेम करणारा तो असतो
कुठलीही अपेक्षा न करता जो फक्त देतो
... तो बाप असतो
-