पिता वचनबद्ध तो एक निर्मळ प्रवाशी
भार्या भ्राता सह वर्षे चौदा झाले वनवासी....
अरण्यात जाऊनी रक्षले कित्येक साधुसंत
सफल झाले होमयज्ञ करूनी दानवांचा अंत....
शबरीचे उष्टी बोरे खावून खरे धन्य जाहली भक्ती
अहिल्येच्या शिळेला स्पर्शूनी दिली तिला मुक्ती...
एकदिवशी सीतामाईचे अपहरण करे बहुरंगी
शोध घेता दक्षिणेकडे मिळे परम भक्त बजरंगी...
मानव वानर एकत्र केले वाजवला जगात डंका
धर्म धरा वर पुन्हा जन्माला नष्ट केली दृष्टांची लंका...
धर्म सत्यावर आधारित , ज्ञान असे निर्मल गंगा
हर दुःखाचे इथे निवारण वंदन आमचे श्रीरंगा....६-
छ.... छत्र गोरगरीब जनतेचे
त्र.....त्रयलोक्याचा ठेवा जपला घराघरात...
प.....परमपराक्रमाने बळ दिले
ति....तिमिरातून तेज तळपवले जनमानसांत...
श्री....श्रीयांश घडवले स्वराज्य
शि... शिस्तप्रिय गनिमी कावा नसानसात...
वा....वाणीत असे मधुरता
जी....जिजाऊंचे पुत्र प्रत्येकाच्या मनामनात...
म......मर्द मावळ्यांचा आधार
हा.....हार न मानी शिवविचार श्वासाश्वासात...
रा......राजे त्रिवार मुजरा घ्यावा
ज......जयजयकार घुमू दे साऱ्या आसमंतात...
-
ज्यांना समज कमी असते, त्यांना गैरसमज व्हायला वेळ लागत नाही, जे पक्षी मोजत बसतात त्यांना आभाळ कधीच कळत नाही...!
-
प्रेम कशावर करता हे तेवढेस महत्त्वाचे नाही, हृदयात प्रेमाची ज्योत तेवत आहे ना तेवढं पुरेसं....
-
एक नकारात्मक दृष्टीकोण कधीच सकारात्मक जीवन देऊ शकत नाही..
विचार सरणी सकारात्मक ठेवली की मन शांत राहते..
शांत मन आणि एक विचार व्हायच्या कसोटीनेच माणूस सकारात्मक जीवन जगू शकते आणि हाच आयुष्याचा योग मंत्र...-
निळीशार अरब सागराची कास
सर्वांगी डोंगर दऱ्यांचा वेश...
अवघ्या भारत भूमीवर शोभतो
माझा पवित्र महाराष्ट्र देश....
संतांची अभंगवाणी, क्रांतीची दाही
संस्कृतीचा एक निर्मळ उपदेश...
अवघ्या भारत भू ची शान राखतो
माझा पवित्र महाराष्ट्र देश...
-
गिळण्यास प्राण उठला जरीं ही कृतांत।
संभाजी धर्म जगले जळत्या रणांत।।
सूर्याहुनी ही अति दाहक धर्मभक्ती।
स्फुरण्यास नित्य धरुया शिवपुत्र चित्तीं।।
-
गणित अगणित नाव रूप
सारे सामावले हृदय एक...
कर्तृत्व, शौर्य सारे तुझे
तू महान सावित्रीची लेक...
-
भास्कराही आधी सुरू
होते जिची दिनचर्या...
कित्येक रूप सजली
आई कन्या दिदी भार्या...
शौर्यगाथा तुझ्यामुळे
नांदत आहे अंगणी...
स्वराज्याचे फुलवले
बीज शिवबाच्या मनी...
स्त्री पुरुष हे दोघेही
कुशीत तुझ्या जन्मता...
क्रांतीज्योती तूच खरी
दूर केली विषमता...
निर्भिड लढा देऊनी
तूच गाजली त्रिभुवनी...
स्त्री शक्तीची प्रेरणा
झाशीची राणी मर्दानी...
उत्तुंग भरारी पुढे
चरणी ठेवतो माथा...
प्रत्येक रुपात तुझ्या
वसलेली नवी गाथा...
-
अरुणा आधी वंदावे
नमन तू अधिपती
चिंता हरतो विश्वाची
आराध्य तू सुखपती || १ ||
आधार स्मरण मात्रे
पाठीराखा तू श्रीपती
अनाथास आहे नाथ
मां बाप तू गौरीपती || २ ||
लावतो मार्गी सुफळ
विश्वास तू रंगपती
चौष्ठ कलांची देवता
उत्साह तू छंदपती || ३ ||
दुर्वा कमळे प्रिय
सुवास तू गंधपती
मोदकांचा आहे भोग
ओंजळ तू सुरपती || ४ ||
उदरात घ्यावे भक्तां
सुवेळ तू मोक्षपती
अंकित मी चरणाचा
साऱ्यांचा तू गणपती || ५ ||-