Anil J Pawara   (Prof_Anil)
43 Followers · 39 Following

8 MAR AT 20:06

"आवडलेलं जपता आलं पाहिजे
आणि,
निवडलेलं टिकवता आलं पाहिजे...!!"


-


20 MAY 2024 AT 9:16

एखादी व्यक्ती जर तुम्हाला प्रत्येक
गोष्ट शेअर करत असेल तर
समजुन जायचं त्या व्यक्तीला स्वतःपेक्षा
तुमच्या वर जास्त विश्वास असतो...



-


20 MAY 2024 AT 9:05

आपल्या आयुष्यात एखादी तरी
व्यक्ती POWER BANK सारखी असावी.
मनाची BATTERY संपल्यावर सकारात्मक विचारांनी CHARGE करणारी..!✨❤️

-


11 APR 2024 AT 11:22

स्वतःशीच केलेला संवाद
म्हणजे आयुष्यातील रिकाम्या
जागांची प्रश्नपत्रिका
सोडवण्यासाठी केलेला
अभ्यास....

-


4 FEB 2022 AT 9:07

जी आपल्याला जगण्यासाठी
खूप आत्मविश्वास,ऊर्जा
आणि ताकद देते...
तीच व्यक्ती आपला
विक पॉईंट बनून जाते...

-


28 JAN 2022 AT 10:41

आयुष्यात फक्त दोनच
गोष्टीमुळे तुम्ही ओळखले जाता.!
एक म्हणजे...
तुमच्याकडे काहीही नसताना
तुम्ही दाखवलेला संयम....!
आणि दुसरे म्हणजे...
तुमच्याकडे सर्वकाही असताना
तुमच्याकडे असलेली नम्रता..!

-


26 JAN 2022 AT 8:30

एकच झेंडा हाती आमुच्या,
स्वातंत्र्य,समता,बंधुत्वाचा,
उंच निळ्या नभात पसरेल,,
रंग भारतीय तिरंग्याचा.....!

-


12 JAN 2022 AT 16:28

Happy National Youth Day..
to all my Young Friend and Aspirants
We have to the Responsibility
to create a better future
and a lot of Responsibilities
as the Younger Generation,
is on our Shoulders.
So grow together,
work hard make a difference in the world..! :)

-


21 DEC 2021 AT 22:25

मावळतीच्या उताराला घरंगळत चाललेला सूर्य...
तो क्षितिजाजवळ जाताजाता तांबूसपणा नेसतो...
मध्यान्हीला डोकी तापवतो...
त्याहून कितीतरी पटीच्या लाघवी,
रूपाने तिन्हीसांज गाजवतो...
आयुष्याच्या रणांगणात असं,
सूर्य होऊन जगता यायला हवं...

-


10 DEC 2021 AT 22:48

कोणापासून आणि किती
दूर रहायला हवं हे
वेळीच कळलं तर बरं पडत..
पुढे जाऊन होणाऱ्या
त्रासापासून आणि
पश्चातापासून स्वतःला
वाचवता तरी येत...

-


Fetching Anil J Pawara Quotes