20 JAN 2018 AT 16:01

सरळ ती का नसे,
वाट तुझं येण्याची ?
तरी मनी लागते,
आस ती पाहण्याची !

थांबावे किती अन ,
किती घुटमळावे काही ?
आता आकाशीही संपले चांदणे,
मोजत मी जे राही !

मिठीत तुझ्या मिळावा,
एक क्षण आसवे वाहण्याचा...
भेट एकदा सोडेन मग,
मोह वाट मी पाहण्याचा...

शस्त्र लादूनी गेला होता,
न सांगता गतवेळी...
सांग मला कोणाची होती,
छातीत भेदरलेली गोळी ?

-