कलेशी समरस होऊन जगताना घडवले स्वतःत अनेक पैलू
कवी, लेखक, गायक, संगीतकार असा हा अवलिया अष्टपैलू
असू दे अवतीभवती बदके अनेक वावरतो तळ्यात मुक्त हा हंस
लेखणी भारदस्त याची सर्व पुस्तके म्हणवली जातात राजहंस
सगळ्या क्षेत्रात मुक्त वावरणारा हा कलासक्त आहे अलौकिक
स्वकर्तुत्वावर यश कधीच जोडत नाही वडिलांचा नावलौकिक
दंतचिकित्सा जर आर्ट असेल तर हा आहे नावाजलेला आर्टिस्ट
ज्यात शिक्षण झाले ते कामही आवडीने करतो हा डेंटिस्ट
लेखणी, काव्य जितके सुरस तितकीच अमोघ याची वाणी
दैवी देणगीवर स्वरसाज चढवून म्हणतो सुरेख गाणी
काय जमत नाही याला! हा पॉडकास्ट चॅनल चा मेकर
प्रत्येक गोष्टीतून आनंदच पसरवतो आशुतोष जावडेकर
वयाने मोठा असूनही आम्हा सर्वांनाच वाटतो हा Cool Bro
अनेक लेखकांना व्यासपीठ देतो निमित्त ज्याचे Book Bro
भेट नाही पण याच्याशी नुसता संवादानेही होतो संतोष
गोड स्वभावाने सर्वांनाच आपलंस करणारा असा डॉ. आशुतोष.
-सहज सुच..लेले✍🏻-
अव्यक्त
काहीही घडले तरी कृती न करता षंढासारिखा उभा राहसी स्तब्ध तू
हिंमत नाही तुझ्यात म्हणून देवाला घालतोस पाण्यात भोळा भक्त तू
मराठे साम्राज्य स्थापण्यास एकेकाळी जाऊन फोडलेलेस दिल्लीचे तख्त तू
एरवी मर्दुमकीचा आव आणतोस परी कृतीची वेळ येता होतोस पोक्त तू
घडून जातात घटना, शमतात वादळे निघून गेली वेळ तरी होत नाही व्यक्त तू
म्हातारा हिमतीचा म्हणवेल तुझ्यापुढे आणि म्हणे तरुणाईचे सळसळते रक्त तू
संकट उंबऱ्यात उभे ठाकले तरी तू निवांत तेव्हा बघू म्हणत केलंय स्वतःस अलिप्त तू
व्यक्ततेची शक्ती क्षीण, बोथट झालीय व्यक्ततेच्या गर्तेतला भटकता अव्यक्त तू...
- सहज सुच.. लेले (आनंद लेले)-
काल सोमप्रदोषनिमित्त झालेल्या अभिषेकानंतर बऱ्याच जणांनी उशिरा माझं स्टेटस पाहिलं आणि आताची ग्रहस्थिती आणि वैश्विक ऊर्जेचा उपयोग करून घेण्यासाठी आम्ही काय करू शकतो किंवा आम्हाला सहभागी होता येईल का अशी विचारणा केली. त्यामुळे उद्या प्रयागराज इथे होणाऱ्या महाकुंभमेळ्याच औचित्य साधून उद्या सकाळी आपण पुन्हा इच्छुक मंडळींसाठी त्यांच्या नाव आणि गोत्राचा उल्लेख करून संकल्पोक्त रुद्र अभिषेक करतोय त्यामुळे जी मंडळी इच्छुक असतील त्यांनी आपले नाव आणि गोत्र मला कळवा😊🙏
-
त्यानंतर फुलपात्रात पाणी घेऊन पळीने देवीची मूर्ती, टाक, पादुका यापैकी जे काही असेल ते ताम्हनात घेऊन त्याला शुद्ध जल अर्पण करायचे आहे. नंतर हळदकुंकू मिश्रित पाणी, सुगंधी द्रव्य मिश्रित पाणी, अष्टगंधमिश्रित पाणी अर्पण करून पुन्हा शुद्ध जल अर्पण करायचे आहे त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर हे पाच घटक एकत्र करून तयार केलेले पंचामृत चमच्याने पाच वेळा देवीवर वहायचे आहे आणि पुन्हा शुद्ध पाणी अर्पण करून गंध, अक्षत फुल देवीला वाहायचे आहे. त्यानंतर देवीची मूर्ती स्वच्छ धुऊन घेऊन दुसऱ्या ताम्हनात घेऊन शुद्ध जल किंवा गाईचे दूध आणि शुद्ध जल एकत्र करून त्याचा अभिषेक देवीला करू शकता. अभिषेक करताना श्रीसूक्त, महालक्ष्मी अष्टक, देवी सूक्त किंवा काहीच येत नसल्यास युट्युब चॅनल वर लावून श्री कुलस्वामिन्यै नम: या मंत्राने देवीला अभिषेक करावा. अभिषेक झाल्यावर देवीची मूर्ती स्वच्छ धुऊन पुसून एका ताम्हनात घ्यावी. ज्यांना शक्य असेल त्यांनी याच मंत्राने व स्तोत्राने कुंकूमार्चन करावे आणि शक्य नसल्यास मूर्ती पुन्हा देव्हाऱ्यात ठेऊन तिला गंधफुल वाहावे. त्यानंतर धूप आणि दीप ओवाळून जो काही प्रसाद केला असेल तो नैवेद्य म्हणून दाखवावा. काहीच केले नसल्यास मिठाई आणून दाखवली तरी चालेल आणि त्यानंतर आरती करून देवीची प्रार्थना करावी. अशा रीतीने उद्या शाकंभरी पौर्णिमेनिमित्त देवीची पूजा आपण करू शकता😊🙏🏼
-
बऱ्याच जणांनी शंका विचारली की उद्या अभिषेक कसा करायचा म्हणून इथे सांगतोय.
आपल्याकडे कुलस्वामिनी देवीचा टाक, अन्नपूर्णेची मूर्ती किंवा देवीच्या पादुका असल्यास त्यावर पंचामृती पूजा करून अभिषेक करायचा आहे.
सर्वांत आधी पूजेला सुरुवात करण्याअगोदर हातात पाणी घेऊन जो अभिषेक आपण करणार आहोत त्याचा संकल्प करायचा आहे. संस्कृत मध्ये करण्याची आवश्यकता नाही. आपल्याला जे काही मागण मागायचं आहे ते देवीला सांगून आणि आजवर जे काही मिळालं त्याबद्दल देवीकडे कृतज्ञता व्यक्त करून मनोभावे प्रार्थना करून पाणी सोडायचे आहे.-
नवीन वर्ष 2025
नवीन वर्ष नवी दिशा
नवीन संकल्प नवी आशा
नवी स्वप्ने साकार करण्या
मिळो तुम्हा नवीन ऊर्जा
नवीन वर्षाच्या स्वागताला
सज्ज राहा भरुनी दोन्ही हात
मागील वर्षातील अनुभवांचा
असू द्या सुरेल मिलाप
नवे क्षितिज खुणावते
ईश्वरचरणी ठेवा विश्वास
नवं वर्ष आनंदाने जावो
हीच आमची अभिलाषा खास
- अमृता योगी-
रोज आपुलकीने येणाऱ्या तुझ्या Good Morning ची सुद्धा सवय लागली होती.
आता क्वचित येणाऱ्या रुक्ष Hi च सुद्धा नवल वाटत नाही...
- सहज सुच..लेले✍️-
विनाकारण आनंदी राहीलं की आनंदी राहण्याची कारण आपसूक आयुष्यच आपल्याला समोरून देत राहतं😊
-
परतीचा पाऊस कोसळत नसतो
परतून येणार नसल्याने डोळ्यांच्या दोन्ही कडांनी मनसोक्त वाहतो-
Jaanbaaz hindustan ke या वेब सिरीज मध्ये एक डायलॉग आहे की Situation and person is not black and white all the time, sometime it's grey🩶
माणसं जशी दिसतात जशी भासवतात तशी नसतात. ज्यांच्यावर जीव लावतो त्यांचा कार्यभाग संपल्यावर त्यांची ग्रे साईड दिसू लागते आणि आजवर जे काही दाखवलं जात होतं तो फक्त देखावा होता याची प्रचिती सुद्धा येऊ लागते. मनाने व्यक्ती काळी ठिक्कर किंवा ब्लॅक आहे हे एकवेळ पचवता येईलही पण ती ग्रे आहे हे पचवणं अत्यंत जड जातं.
योगायोगाने म्हणा हा ग्रे दिवस आज असणं ही Irony आहे-