Will be grateful for my people, books and time. Just wish that, Each every word of my poem gives some joy to others.🤗
-
सांजवेळी शामरंगी
आभाळ खूनावे रुदयापरी
हास्यात जरा रमून जा तू
गूज सांगे त्या सावळ्याच्या उरी
चित्र ते रेखाटत जा
अंतरीच्या जाणिवेचे
भास ते उतरवत जा
तुझ्या नेत्र पल्लवीच्या रंगाचे
दाटलेला तो कातर
अंधार खुनवती विषयांच्या सरी
चित्त ते गुंतून जाई
आनंदाच्या लहरींवरी
आस ती साद देती
नाद उमटे अंतरी
प्रेमाने गुलाब सजला
तुझ्या त्या हास्यावरी
-
Live without
expectations
Hesitation
Tension
Full of emotion
And social attention
-
मनाच्या आशेची
नवीन नांदीची
शुभ्र कमळ मनाची
निस्वार्थ बुध्दी प्रेमाची
विचार विहारांची
निखळ हास्याची
गोड साद प्रतिसाद शब्दांची
झुलवणाऱ्या स्वप्नाची
आणि एका गोड चहाची
सुंदर नवं वर्ष सकाळ-
मनाची बांधणी
आणि स्वतःची आखणी
खूप नाजूक स्वर आहे
गोंगटातून बुजलेला
भावनांचा कहर आहे
सयंमात लपलेला
विषारी ज्वर आहे
आनंदात उसळलेला
बंधनांचा खेळ आहे
जसा हास्यात विरलेला
बुध्दीचा सुर आहे
मौनात न ऐकलेला
भावनांचा कलोळ आहे
तर सुरेख हो.....ला रेटलेला
शब्दांचा ओघ आहे
स्मितहास्याने शोधलेला
आत्म्याचा निखळ नाद आहे
इच्छांच्या पूर्ण अपूर्णचा
साधलेला जीवन तटावरचा
सुरेल संगम आहे
तो आणि मी चा
न संपणारा प्रवास आहे
जीवनाच्या सोबतीचा
तोच एक ध्यास आहे
-
राधेच्या रमनीचा सांगावा
त्या चित्तान असा झेलला
भावनेचा मोती जसा
तिच्या नेत्रांनी अलगद टिपला
जमिनीवर ही पाऊल उमटले
ठसे जसे सजले विचारांचे
मन ही पुन्हा निनादले
पाहून सख्य डोळ्यांचे
वाट ही अडवली त्यांनी
डोह ही रीता झाला
रमनीचा तो अल्लड सांगावा
आपलाच डाव उधळून गेला
-