घर असावं तर प्रेमाच्या बांधिलींत रमलेल,
कुटुंब सजाव तर प्रेमाच्या वागणुकीवर,
एका चुलीवरच्या जेवणाची वेगळीच मज्जा असते,
सह कुटुंबातील सर्वांची तर मायेची थाप राहते,
बोट चाटत चाटत जेवण सुंदर झालं म्हणून घराच्या सांगायचं,
अजून जेवण हवं म्हणून पोटातून भुकेचा काहूर फोडायचा,
गप्पाच्या दुनियेत कुटुंब सारं बुडत,
कधी कोणाचं चुकलं म्हणून सर्वांचं हसू येत,
मजेशीर गंमतीसोबत जुन्या आठवणी बाहेर पडतात,
घराची सुंदरता कशी वाढेल या कडे सारे लक्ष देतात,
चार भिंतीच्या भोवऱ्यात कुटुंब नावाची गोष्ट मी ऐकली,
मोडक्या तोडक्या घरात मग मी माझी आठवण सर्वाना सांगितली,
हल्ली चुलींचे चार चार भाग झालेत,
चार भिंतीच्या मध्ये सर्वाचं स्वतःचा हिस्सा हवाय,
आताच्या नव्या पिढीला कुटुंबाची भाकर चुलीवर भाजता येईल का,
भूक लागली म्हणून घरातल्यान बोलवता येईल का ???.- शब्दांचेअवजार
8 NOV 2019 AT 11:24