महिलांच्या अत्याचाराविरोधात अविश्वास मांडला होता
विरोधक थोडेच पण एकानेच घाम फोडला होता,,
देशाचा हुकूमशहा चेष्टा,मस्करी आणि मजा उडवत होता
विश्र्वगुरू म्हणणारा जिंकून सुद्धा घायाळ झाला होता,,-
Not Born Writer
May 3rd
Love to write
Love to Love
Love to Business
Story W... read more
भरदुपारी वाट पाहतोय
आजही त्याच ठिकाणी,,
कुणाला भेटली तर
तिला सांगेल का कोणी ??
- अमोल रामेश्वर-
विसरभोळे आणि भोळे असावे माणसाने....
सुखी राहण्याचे हे साधे तंत्र शिकावे माणसाने....
- अमोल रामेश्वर-
चुकीला चूक म्हणायला,
जर तुमचा धर्म आडवा येत असेल तर तुमचं माणूसपण धर्माने हिसकावून घेतले आहे.
त्यालाच धर्मांधता म्हणतात.
धर्म माणुसकी पेक्षा मोठा झाला की त्याचा बाजार होतो.
खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे.-
चिवचिवणारी ती चिमणी
गेली कुठे कुठल्या वणी,
दिसेना ती तारावरती,
दारातल्या दोरीवरती,
भास तिचा होत नाही।
हल्ली आठवण येत नाही
वनांमध्ये रानामध्ये
घरटे तिचे दिसत नाही,
गात नाही शेतात गाणी
पीत नाही पाटावर पाणी
चिवचिवणारी ती चिमणी
गेली कुठे कुठल्या वणी,,
- अमोल रामेश्वर-
"असच"
"असच" नसत हसत कोणी!
पाहून कुणाकडे एकटक,,
"असच" घाबरत नसत कोणी!
अन मनात होते धकधक,,
"असच" का बर बोलेल कोणी?
तुमच्या आवडणाऱ्या गोष्टी,,
"असच" का बरं करेल कोणी?
तुम्हाला ते आवडण्यासाठी,,
"असच" का बरं जागेल कोणी?
गप्पा मारत इतक्या रात्री,,
"असच"का बरं धरेल कोणी?
पावसात तुमच्यासाठी छत्री ,,
"असच" का चोरून पाहिलं कोणी?
अन मनातच गुणगुणेल गाणी,,
"असच" का वेडे होईल कोणी,,?
प्रेमात शहाणे नसते कोणी ,,
-अमोल रामेश्वर-
ती जरी असली तरी
तुझा भास होतो ग,,
क्षणभर का होईना
खूप त्रास होतो ग,,-
वेळेनुसार लिहण्याची सवय बदलते
बदलतो स्वभाव, परिस्थिती बदलते,,
आठवणीत मन कधी दुःखात जाते,,
वास्तविक जीवनात हसू निघून जाते,,
-