स्वतःचे विचार, तत्वे, अस्तित्व
स्वतःच्या हाताने संपवुन
पुन्हा उभारी घेण्यासाठी "गरुडाचे "
काळीज लागते-
पारंपारिक प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने प्रवास करताना स्वतःला वृक्ष समजून फळाची अपेक्षा करायची नसते.
तर स्वतःला बीज समजायचे असते त्यामुळे आपल्याला संघर्षांची प्रेरणा मिळते व आपण त्या संघर्षाच्या काळात सकारात्मक ,आशावादी व आनंदी राहतो.
अन्यथा संघर्षाचा काळ सहन होत नाही.-
ज्या व्यक्तीला पैस्याची किम्मत माहिती आहे .
त्याच्या जवळ कितीही पैसा असला तरी तो योग्य मार्गीच लागतो.
(" पैसा कमवणे हा काही गुण्हा नाही " )-
दैनंदिन व्यवहारातुन लोकांना खर तर
प्रसिद्धी , पैसा , सत्ता ,माहिती , मान , समाधान ...
हवे असते .
पण कोणी विचारले आपण हे कार्य का केले तर ..
आदर्शात्मक उत्तर देतात.-
माना के रहो मे आती है मुश्किले
गिरने के डर से चलना ही छोड़ दू
वादा किया है मंजिलों से मै आऊँगा जरूर
कैसे मै भला उस वादे को तोड़ दू
-
जो व्यक्ती स्वाताःचा अहंकार जपतो. त्या व्यक्ती कडुन व्यव्हार कुशल व्यक्ती त्याला हवी तशी कामे करुन घेतो.
-
जो व्यक्ती दुसर्यांचा अहंकार जपतो तो व्यक्ती सर्वांला आवडतो व अश्या व्यक्तीला लोक सर्वप्रकार ची मदत करायला तयार असतात. समाजिक जिवनात अशी व्यक्ती सर्वोच्च पदी जाते.
-
ज्या नेत्यावर लोक टिका करतात व त्यांनी ऐखादे काम ऐखाद्या विशिष्ट पद्धतीने करावे ही अपेक्षा करतात . मग तो नेता कुठल्या मोठ्या पदावर असो वा नसो पण त्या नेत्या मध्ये " बदल घडविण्याची क्षमता , ताकत व सत्ता असते " . क्षमता नसलेल्या नेत्यावर मग तो कितीही सर्वोच्च पदी असला तरी लोक टिका करत नाहीत .
-
"आनंदी व समाधाणी जिवन " आपल्या यशाची व्याख्या ही आपली स्वताःची असली पाहीजे. ती कोणाची तुलना न करता व कोणाच्याही प्रभावाखाली न येता केलेली हवी . तेव्हा आपण आहे त्या परिस्थिती मध्ये आंनदी आणि समाधानी जिवन जगतो. मग आपल्या चेहर्या वरचे हस्य आणि आनंद पाहुन ज्यांच्या यशाची व्यख्या ही कुणी दुसर्यांनी निर्माण केलेली असते अशी लोक आश्चर्यचकीत होतात.😃
-
अतिरेकी साहसवादा प्रमाणे अतिरेकी सावधानता देखील आत्मनाशास कारणीभुत ठरु शकते.
-