भान गवसले स्थिरले रुपावरी
शब्द फुटेनासे हरपले क्षितिजावरी
ओठांनी भिजले मन जणू काठावरी
भाळले वेडे कसे केव्हा कुणावरी
ते नयन बोलले काहीतरी...
प्रेमकिरण उधडले भिडले मेघासही
तेथून बरसले संचारले रोमांच तनुवरी
काळीज धडकले विखुरले अन् भूवरी
रंजनात रमले हरवले मग युगलातही
ते नयन बोलले काहीतरी...
शरमेने झुकले नयन पाणावले किंचितही
हास्य बोलके निरागस अवतरले गालावरही
डोह भरले आनंदाचे अदभुत चैतन्य देहातही
बंधनात या अडकले स्वच्छंदी हे जीवही
ते नयन बोलले काहीतरी...
क्षण हे फुलले झाले रेशमी सुगंधितही
मन अन् जुळले तन अवचितही
सप्तरंग झळकले चांगले आकाशी
प्रेमहंस विहरले सुखात उमलले कमळही
ते नयन बोलले काहीतरी...
-