इच्छा होती मनात माझ्या
पहिल्या पावसात तिची भेट घडेल...
पण कुठे ठाऊक होतं हा असा अवेळी
ऋतूच्या आधीच येऊन पडेल...-
नाती गोती जपता जपता
मी खूप ठिकाणी झुकलोय...
नाही जमत हरलो आता
मी खरंच खूप थकलोय...— % &-
कस ओळखावं तुला...?
तुझ्यातल्या घुसमटीला
तुझ्यातल्या रागाला
तुझ्यातल्या एकांताला
तुझ्यातल्या भाबडेपणाला
नात्याचं नावीन्य चार दिवसांचं
क्षणिक बुरसाटलेल्या भावनेच
अलवावर पडलेल्या थेंबाच
अलगद निसटणाऱ्या कवेच
बर मग सांग...कस ओळखावं तुला...?
— % &-
हातात हात धरून चालायला शिकवणाऱ्या आणि पाय धरून मागे खेचणाऱ्या माझ्या सर्व गुरूंना त्रिवार मानाचा मुजरा.
हात धरणाऱ्यांनी "मार्ग" दाखवला आणि पाय धरणाऱ्यांनी "संघर्ष" दाखवला.-
ओढून ताणून शब्दांना
बांधणं मला जमत नाही.
जेव्हा असते मनातून इच्छा
तेव्हा लिहीन मी सोडत नाही.-
माझ्याकडून काही चुकत असेल,
तर माफी तुझी मागतो.
पण त्यात तुझा इगो मध्ये येत असेल,
तर तूर्तास मी थांबतो.-
माझा राग घालवायला
तू देतेस फार आमिष.
या रागाच पण भलतंच आहे
तो जातो अगदी निमिष.-
भावुक स्टेटस टाकून भावना,
मोकळ्या करता येत नाहीत...
गुंतलेल्या मनाला सोडवायला,
सात जन्मही पुरत नाहीत...-