आयुष्यातले काही निर्णय हे आपले स्वत:चे नाही, तर ते वेळ आणि परिस्थितीचे असतात!
-
From-Solapur (Maharashtra)
Email- amitvsabale@gmail.com
पहिली भेट काळजात
प्रेमाचं स्वप्न पेरून गेली
तुला मला आयुष्यभराचा
जोडीदार करून गेली
-
आयुष्यातल्या अनेक PROBLEM'S वरचं SOLUTION म्हणजे मित्र,जिंदगीची खडतर JURENY हसत हसत पार करण्यासाठीची ENERGY म्हणजे मित्र!
-
नुसतीच आयुष्यात माझ्या माणसांची गर्दी आहे
मनातला भाव जाणून घेणारा एकही इथे दर्दी नाही
-
माझ्या जगण्याला
सुगंधीत करणारे अत्तर तु
आयुष्याला पडलेल्या
अनेक प्रश्नांचे उत्तर तु-
माणसं धोका देतात हे खोटं आहे,तर ते मौका बघुन धोका देतात हे सर्वात जास्त खरं आहे...!
#थेट_जगण्याच्या_पुस्तकातून-
जय भिम
माणसाने माणसाला दिलेली
आंतरिक दाद जय भिम
विचारांनी विचारांशी
केलेला संवाद जय भिम
धम्माच्या कुपीतलं
समतेचं अत्तर जय भिम
मनुच्या विषमतेला
दिलेलं उत्तर जय भिम
पानोपानी विद्रोह सांडणारं
कलम जय भिम
पिढ्यान पिढ्यांच्या जखमेवरचं
मलम जय भिम
पंडितातल्या पंडिताचं
तत्वज्ञान जय भिम
फाटक्यातल्या फाटक्याचा
स्वाभिमान जय भिम-
जाळून मनुस्मृतीला भिमाने
समतेची सकाळ आणली होती
धर्मनिरपेक्ष भारताची अशी
त्यांनी तस्वीर कोरली होती-