जी जवळ नसताना देखील जिच्या प्रेमाची उब तेवढीच जास्त जाणवते ती आई असते! जी नजरे आड असून ही जिच्या डोळ्यातली काळजी इथूनही स्पष्ट दिसते ती आई असते! जी हजारो मैलांवर असूनही जिच्या आवाजमधलं प्रेम तेवढंच प्रखर ऐकू येते ती आई असते जी आज समोर हसताना जिच्या डोळ्यात काळजीने पाणी दाटून येते तो आई असते ।। सार काही अवघड दिसत असताना जी पाठी असल्याने सारे सोपे होत जाते ती आई असते!