अक्षता  
24 Followers · 14 Following

Joined 1 April 2018


Joined 1 April 2018
30 NOV 2021 AT 10:26

अल्लड मनांचे सूर,
कळत नकळत जुळलेले...
सुखी संसाराचे तुमच्या,
चित्र नियतीने रंगवलेले...

सुखदुःखाचे वाटेकरी तुम्ही आता,
कायम रहा एकमेकांचे सोबती..
रुसवे-फुगवे असता जरी,
बहरत राहो तुमची प्रीती..

दैवाने जोडली ही रेशीमगाठ,
साऱ्यांनाच वाटतो तुमचा हेवा..
सदैव बरसतील तुषार प्रेमाचे,
श्रध्दा मनात कायम ठेवा..

सुखांनी सजली ओंजळ आज,
गालबोट तिला न कोणाचं लागो..
हृदयस्पर्शी तुमच्या प्रेमाला,
अनंतापर्यंत दीर्घायुष्य लाभो..❤️

- अक्षता😊

-


13 OCT 2021 AT 15:29

सवय नवी जडली आता,
चुकल्यासारखं वाटतं काहीतरी..
कळत नकळत काही घडतं,
मनात नसतं किंचित जरी..

नाजूक असतात मनं भावनांची,
ठेच लागताच क्षणात तुटतात..
हक्काने बोलावं काही तर,
गैरसमज वाढत जातात..

आठवण येते,खूप येते..पण
मग आठवतो आपल्यातला वाद..
आधी तू च्या अविर्भावात,
हरवला आहे आपला संवाद..

चूक कोणाचीच नाही खरंतर..
मात्र नात्यात आला दुरावा..
हेवेदावे विसरुन सारे,
मिळेल का सुखाचा विसावा..

- अक्षता

-


1 JUL 2021 AT 23:53

मृगजळामागे धावण्यातही,
एक वेगळं सुख असतं..
पूर्णत्वाला जाणारं नसलं,
तरी नि:स्वार्थ भावनेचं प्रेम असतं..

भविष्याची पर्वा नसते,
कारण वर्तमानात आनंद असतो..
उद्याच्या सुखी स्वप्नांपेक्षा,
आजचा क्षण मोलाचा असतो..

बरं-वाईट,योग्य-अयोग्य,
यापलीकडचं जग असतं..
निरपेक्ष मनाने जोडलेलं,
मनस्वी असं नातं असतं..

सुखद असा हा निनावी अनुभव,
प्रत्येकाच्या आयुष्यात असतो..
वास्तवाशी जुळत नसला तरी,
ह्दयाने तो जपलेला असतो..

- अक्षता😊

-


1 JUL 2021 AT 17:05

मृगजळामागे धावण्यातही,
एक वेगळं सुख असतं..
पूर्णत्वाला जाणारं नसलं,
तरी नि:स्वार्थ भावनेचं प्रेम असतं..

भविष्याची पर्वा नसते,
कारण वर्तमानात आनंद असतो..
उद्याच्या सुखी स्वप्नांपेक्षा,
आजचा क्षण मोलाचा असतो..

बरं-वाईट ,योग्य-अयोग्य,
यापलीकडचं जग असतं..
निरपेक्ष मनाने जोडलेलं,
मनस्वी असं नातं असतं..

सुखद असा हा निनावी अनुभव,
प्रत्येकाच्या आयुष्यात असतो..
वास्तवाशी जुळत नसला तरी,
ह्दयाने तो जपलेला असतो..

- अक्षता😊

-


9 JUN 2021 AT 10:07

आल्हादाच्या ऋतूमध्ये या,
प्रेमरंगी ही सृष्टी वाटते.,
मोहक येता सर पावसाची,
अनामिक तुझी ओढ दाटते..

नाव पडता कानी तुझं,
शहारुन मनी रोमांच उठतो.,
नकळत झालेला स्पर्शही तुझा,
मनमोराला सुखावून जातो..

कधीतरी एकांती,
तुझ्या सोबतीचा आभास होतो..
कळी खुलते ओठांची,
अन् कृष्ण मनीचा मोहरतो..

लाजेने होता चिंब मग,
बंद डोळ्यांनी तुला पाहते..
नटखट स्मृती तुझ्या भेटीची,
आठवून मी गाली हसते..

सुखद असा हा गुलाबी क्षण,
चिरंतन आनंद देऊन जातो..
बहरणाऱ्या मैत्रीला आपल्या,
साज प्रीतीचा चढवून जातो..

- अक्षता😊

-


27 JUN 2020 AT 12:45

रोजचीच ती सांजवेळ,
का अनोखी वाटते आज..
कळी गुलाबी क्षणात खुलली,
स्मरता तुझ्या भेटीचा साज..

मखमली वाळू,रंगीत किनारा..
वाऱ्यासारखा अल्लड तुझा स्वभाव..
सुरेल त्या मैफिलीत रंगलेला,
आपल्या नजरांचा लपंडाव..

हवाहवासा भूतकाळ असा,
डोळ्यांसमोरुन जातो अलगद..
नाजूक फुलासम जपलेला मी,
प्रत्येक हळवा तो क्षण सुखद..

- अक्षता

-


26 JUN 2020 AT 19:04

का अनोखी वाटते आज,
कळी गुलाबी क्षणात खुलली,
स्मरता तुझ्या भेटीचा साज..
मखमली वाळू, रंगीत किनारा..
अन् अल्लड तुझा स्वभाव..
सुरेल त्या मैफिलीत रंगलेला,
आपल्या नजरांचा लपंडाव..
विसर पडतो जगाचा साऱ्या आणि,
नकळतच तुझं नाव येतं ओठी..
अधीर मन व्याकूळ होतं मग,
पुन्हा त्या रोमांचक क्षणासाठी..

-


7 JUN 2020 AT 14:47

अप्रिय कोरोनास,

हो,अप्रियच कारण..
तुझ्या येण्याने जगणेच बदलले,
एकमेकांमधलं अंतर वाढले..
व्यवहार थांबले,रस्ते ओस पडले,
आमच्या सुखी आयुष्याचं चित्र पालटले..

पण तुझ्या येण्याने कळलं...
आपुलकी,प्रेम आणि माणुसकी,
आमच्यात अजूनही शिल्लक आहे..
आणि तुझ्यासारखे शेकडो जरी आले,
तरी परतवण्याची धमक आहे..

खरंतर,
सवय झाली तुझ्यासोबत जगण्याची,
ऐकून रोज तुझ्या त्याचत्या बाता,
ठरवलं आहे प्रत्येकाने..तुला घेऊनच जिंकायचं आता...

तुझ्यामुळेच आम्हाला...
नवी उमेद मिळाली,
बेधुंद होऊन पुन्हा जगण्याची..
स्वप्नांवर बिनधास्त ठेवून विश्वास,
जिद्दीनं सारं जिंकण्याची..

लक्षात घे तू एक ...
तुझ्यासारखे भलेभले अनेक,
आले आणि निघून गेले..
तू ही जा आता असाच,
तुलाही वेळेचे बोलावणे आले..

- अक्षता

-


3 JUN 2020 AT 23:21

घायाळ ती आई एकटी,
पिल्लासाठी कळवळली,
भयानक शिक्षा मिळूनही माणसा,
कशी तुला दुर्बुद्धी झाली..

कोवळ्या त्या निष्पाप जीवाची,
काय अशी चूक होती..
कसला तो आसुरी आनंद अन्
तुझ्या क्रूरतेची भूक होती..

कधी कळणार तुला निर्दया,
हाक नि:स्वार्थ ममतेची..
गरज आहे तुझ्या प्रगतीला,
सद्-विवेकी कठोर शिस्तीची..

आता तरी हो शहाणा अन्
विसरु नको तुझ्या जबाबदारीला,
तूच असशील कारण नाहीतर,
तुझ्या दुर्देवी शेवटाला..

- अक्षता

-


1 JUN 2020 AT 12:20

- अक्षता

-


Fetching अक्षता Quotes